Ahmednagar Breaking : अहमदनगर महापालिकेबाबत अत्यंत महत्वाची बातमी आली आहे. महापालिकेतील लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपणार असल्याचे सर्वांनीच गृहीत धरले होते.
परंतु आता २७ डिसेंबरला मध्यरात्रीच महापालिकेची मुदत संपुष्टात आणली आहे. विशेष म्हणजे यापुढे कोणतीही सभा,
बैठका घेण्यास मनाई करण्यात आल्याने गुरूवारी अर्थात आज होणारी स्थायी समितीची सभा झाली व शुक्रवारी होणारी महासभा आता होणार नाहीये.
सर्वचजण महापालिकेची मुदत ३१ डिसेंबरला संपेल असे गृहित धरून असल्याने सत्ताधार्यांनी अखेरच्या काळात सभा घेण्याचा सपाटा लावला होता.
यात काही महत्त्वाच्या कामांच्या निविदांबरोबरच अनेक ‘अर्थ’ पूर्ण कामे घेण्याचा प्रयत्न होता. परंतु आता या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.
गुरूवारी अर्थात आज सकाळी महापालिका आयुक्तांनी २७ डिसेंबरलाच मुदत संपुष्टात आल्यासंदर्भात पत्र काढले आहे. तसेच मुदत संपल्यामुळे पुढील काळात कोणत्याही प्रकारची सभा,
बैठक घेता येणार नाही, असेही निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेची मुदत २७ संपत असल्याचे व त्यानुसार प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात सरकारला पत्र दिले होते.
त्या अनुषंगाने आयुक्तांनी हे पत्र काढले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह प्रमुख अधिकार्यांना या पत्राच्या प्रती देण्यात आल्या आहेत.