Exclusive

Ahmednagar News : सुट्ट्यांचा आनंद घ्यायला मित्रांसह भंडारदऱ्याला गेली, पाय घसरून सांदण दरीत कोसळली, तरुणीचा जागीच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar News : सध्या सुट्ट्या आहेत. रविवार, नाताळची सुट्टी सध्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा सुट्टीत बाहेर फिरण्याचा प्लॅनिंग आहे. परंतु याच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मित्रांसोबत भंडारदऱ्याला गेलेल्या तरुणीच्या जीवावर बेतले आहे.

तरुणीचा जागीच मृत्यू

सांदण दरी पाहण्यासाठी ते गेले होते. तरुणीचा पाय घसरला आणि ती खाली कोसळली. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐश्वर्या खानविलकर (24 वर्षीय) असे या मृत मुलीचे नाव असून रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.

बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन

रविवार व सोमवारी नाताळ असल्याने जोडून सुट्टी असल्याने तरुणी आणि तिच्या मित्रांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. परंतु त्यांचे हे नियोजन अगदी जीवावर बेतेल याची त्यांना कल्पनाही नव्हती.

दरी पाहण्यासाठी आली व पाय घसरून पडली.

सलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात भरपूर पर्यटक आहेत. ही तरुणी दरी पाहण्यासाठी आली व पाय घसरून पडली. ती पडली त्यावेळी तिच्या आजुबाजूला सावरण्यासाठी कोणी नसल्याने ती थेट खोल दरीत जाऊन पडली.तिच्या हातापायांना तसेच डोक्याला जबर मार लागला होता. यात तिचा मृत्यू झाला. मैत्रिणीच्या अशा जाण्याने सर्वच मुला मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी

शनिवार , रविवार, सोमवारी नाताळ सुट्टी अशा सुट्ट्या सलग जोडून आलेल्या आहेत. त्यामुळे फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात झालेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत केली जात आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

वनविभागासह पोलिस प्रशासनही निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचे आवाहन वारंवार करत आहे. पर्यटनस्थळी अशा घटना घडत असल्याने प्रवास करताना आणि निसर्गाचा आनंद घेताने प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

हे पण वाचा

अहमदनगर : बाळ झालं, घरात आनंद झाला ! थोड्याचवेळात पोलिसांनी बाळाच्या वडिलांसह आजोबांवर दाखल केला गुन्हा

अहमदनगर रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अंतर्गत भरती सुरु, लवकर पाठवा अर्ज

खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले आमच्या साखर वाटपामुळे ‘त्यांची’ साखर…

कर्जत-जामखेड मतदारसंघातील बसस्थानके होणार सुसज्ज ! कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर

अहमदनगर जिल्ह्यातील मुलीने करून दाखवलं ! कुठलाही क्लास न लावता MPSC उत्तीर्ण

अहमदनगर लाईव्ह 24