Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणाचे विविध पैलू आहेत. उत्तरेतील राजकारणावर विखे घराण्याचे वर्चस्व आहे हे सर्वश्रुत आहे. यामध्ये विखे पाटील यांना पोषक ठरणाऱ्या व त्यांना धरून राहणाऱ्यांना विखे पाटील निवडून आणतात असेही म्हटले जाते. आता आगामी निवडणुकीच्या अनुशंघाने वेगवेगळे सूत्रे फिरू राहिली आहेत. त्यात विखे पाटलांचे स्थान अग्रस्थानी असेल असेच म्हणावे लागेल.
राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे यांनी २०१९ मध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव करत vijy मिळवला होता. ही एकदम घासून टक्कर झाली होती. काळे आणि कोल्हे यांचा राजकीय संघर्ष अगदी जुना आहे. आताची निवडणूक देखील या दोघांच्यातच घासून होईल असे म्हटले जाते. मागील वेळी ही निवडणूक काळे जिंकले ते विखे यांच्या खेळीमुळेच असे म्हटले जाते.
सध्या आ. काळे हे अजित पवार गटात गेले आहेत. यंदा तिकीट मिळवण्यासाठी काळे हे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे दिसते. सध्या काळे यांच्या विकास निधीतून झालेल्या कामांचे उद्धघाटन विखेंच्या हस्ते होत असताना दिसते.
तर काळे यांची विखे यांच्याशी जवळीकता वाढलेली दिसते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काल (मंगळवार) संपूर्ण दिवस कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यांवर होते. यावेळी त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नानातून उपलब्ध झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन स्वतः विखे पाटील यांनी केले. याच माध्यमातून काळे हे आपला गड अजून पक्का करत असल्याच्या चर्चा आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत झालेला परभाव कोल्हे यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 845 मतांनी पराभव झाला होता.
मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे राजेश परजणे यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत 15 हजारावर मते घेतली असल्याने कोल्हेंच्या पराभवामागे कोणते राजकारण कसे फिरले हे वेगळे सांगायला नको. यामुळे कोल्हे नाराज आहेत. या बाबत कोल्हे यांच्याकडून भाजप पक्ष नेतृत्वापुढे तक्रारही केली होती असे मागे बातमी आली होती.
काही घडामोडी पाहता काळे यांना सध्या तिकिट मिळण्यापासून विजयापर्यंत मंत्री विखे पाटील यांचाच आधार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळीही काळे यांना विजयी करण्यासाठी भाजपच्याच कोल्हे यांना शह देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.