Exclusive

Ahmednagar Politics Breaking ! अहमदनगरमधील लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा ! सुजय विखे की लोखंडे ? कुणाची विकेट जाणार, पहा..

Published by
Tejas B Shelar

Ahmednagar Politics Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने चांगलेच तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. एक म्हणजे अहमदनगर मतदार संघातील, आणि दुसरा म्हणजे शिर्डी मतदार संघातील. भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा. सुजय विखे हे अहमदनगर मधून तर खा. सदाशिव लोखंडे हे शिर्डी मधून खासदार आहेत.

आता एक मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनपैकी एका जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील एक जागा अजित पवार गटाने घेतल्यास आश्चर्य वाटण्यास नको.

आमदार संग्राम जगताप यांनाही आशावाद

राष्ट्रवादीचे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप (अजित पवार गट) यांनी सांगितले की, पक्षाला अहमदनगर किंवा शिर्डीतून निवडणूक लढवायची आहे, कारण जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्वादीचे आहेत. अजित पवार यांनी या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेच्या राज्य नेतृत्वाला विनंती केली आहे.

त्यामुळे आमचा पक्ष अहमदनगरमध्ये एक जागा मिळविण्यासाठी आशावादी असल्याचे जगताप म्हणाले. आ. जगताप हे लोकसभा निवडणुकीशी संबंधित कामांसाठी महायुतीचे ते समन्वयक आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले,

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 12 पैकी 6 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरही आमच्या गटात चार आमदार आहेत, जे जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आमच्या आमदारांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एका लोकसभा जागेसाठी आमचा पक्ष स्वाभाविक दावेदार असल्याचे जगताप म्हणाले.

आ.नीलेश लंके यांचे दबावतंत्र?

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आ.नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी अलीकडेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य संपर्क यात्रा काढली होती. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या चर्चेनुसार, अजित पवार यांच्या काही आमदारांनी महायुतीची बैठकीस न येणे व लंके दाम्पत्याची यात्रा हे महायुतीमधील घटकांवर ‘दबाव’ टाकण्यासाठी होते असे म्हटले आहे. तर लंके यांनी आपल्या यात्रेचा लोकसभा निवडणुकीशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

भाजपने शक्यता फेटाळली

जिल्ह्यातील दोनपैकी कोणतीही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता अहमदनगर भाजपने फेटाळून लावली आहे. अहमदनगरची जागा 2009 पासून भाजपने जिंकत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला असल्याने ही जागा त्यांना जाण्याची शक्यता नाही असे म्हटले जात आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com