Caste Validity Certificate :- राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात पडताळणी समितीच्या वतीने २६ जूलै २०२३ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. इयत्ता ११ वी १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे या मोहीमेत दिली जाणार आहेत.
मागासवर्गीय प्रवर्गातील कोणीही विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जातवैधता प्रमाणपत्रासाठी महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज घेतील आणि अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीकडे पाठवतील.
जात वैधता प्रमाणपत्रा विषयी विद्यार्थ्यांना सहज, सुलभ मार्गदर्शन करणारे एकदिवसीय शिबीरांचे ही आयोजन करण्यात येणार आहे.असे अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय?
जात प्रमाणपत्र वैधता हा एक दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीची जात ओळखतो. हा दस्तऐवज देशातील जात आणि श्रेणीमधील व्यक्तीचा फरक प्रमाणित करतो . महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये, राज्यातील नागरिकांना कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्राच्या मदतीने विविध फायदे मिळू शकतात.
जात वैधता प्रमाणपत्राचा फायदा
जात प्रमाणपत्रांचा उद्देश व्यक्तीच्या गरजेनुसार बदलतो : हे सरकारी नोकऱ्या आणि त्यांच्या अर्ज प्रक्रियेसाठी आरक्षण कोटा प्रदान करते. जात वैधता प्रमाणपत्राचा वापर अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे आणि शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणे यासारख्या शैक्षणिक हेतूंसाठी केला जाऊ शकतो. जात वैधता प्रमाणपत्र केंद्र, राज्य, एनजीओ प्रदान करणार्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी.
प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्राथमिक कागदपत्रे
■ ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जाची मूळ प्रत
■ अर्जदार विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र
■ विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला
■ वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
■ आजोबा/पंजोबा/खापर पंजोबा यांचा जात सिध्द करणारा पुरावा.
■ महाविद्यालयाचे शिफारस पत्र
■ शपथपत्र
■ बोनाफाईड दाखला
■ वरील कागदपत्रांच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात सिध्द होत नसल्यास समिती अधिकचे पुरावे मागू शकते. त्यामुळे जात सिध्द करण्याकामी आवश्यक सर्व कागदपत्रे अर्जदाराने आधीच काढून ठेवणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज कोठे भरावा
■ जात पडताळणी प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) https://bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा आणि या अर्जाची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.