Exclusive

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळेल हा मोठा लाभ, वाचा ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

DA Hike : सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घर भाडे भत्ता तसेच वेतन आयोग इत्यादी बाबत महत्त्वाची चर्चा आपण अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहोत. सध्या साधारणपणे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे काही सोयीसवलती व भत्ते दिले जात आहेत ते सातवा वेतन आयोगाच्या माध्यमातून दिले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात असून हा जानेवारी महिन्यापासून दिला जात आहे.

महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होती. परंतु यामध्ये आता जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना चार टक्के नव्हे तर तीन टक्के इतकी महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. म्हणजे जाता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्क्यांवरून 45 टक्के इतका होणार आहे.

याची अधिकृत घोषणा केंद्र शासनाकडून अजून पर्यंत करण्यात आलेली नाही. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही घोषणा होईल याची दाट शक्यता आहे. तीन टक्के महागाई भत्त्यातील वाढ ही कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. अशा प्रकारचे अपडेट आपण महागाईभत्त्याबद्दल पाहत आहोत. परंतु लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सोबतच घरभाडे भत्तावाढ देखील मिळेल अशी एक शक्यता आहे.

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीसोबत मिळेल घरभाडे भत्तावाढीचा लाभ

जर आपण मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीचा विचार केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्ता जेव्हा 50 टक्क्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो शून्यावर आणला जातो. परंतु याच पार्श्वभूमीवर जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा घर भाडेभत्त्यात देखील वाढ होणार आहे.

याचाच अर्थ जुलै 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% पार करेल आणि यावेळी घर भाडेभत्त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये मिळालेल्या माहितीचा विचार केला तर जुलै 2024 मध्ये तीन टक्के घर भाडेभत्ता वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. याआधी 2021 मध्ये घर भाडेभत्त्यात वाढ करण्यात आली होती.

 सध्या इतका मिळत आहे घर भाडेभत्ता

सध्या मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याचा विचार केला तर तो शहरांच्या वर्गवारीनुसार दिला जातो. म्हणजेच जे कर्मचारी ग्रामीण भागात कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना पगाराच्या नऊ टक्के, शहरी भागामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या 18% तर मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच महानगरांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या 27% एवढा घर भाडे भत्ता दिला जात आहे.

जर घर भाडेभत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ झाली तर महानगरांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा घर भाडेभत्ता 30 टक्के, शहरी भागामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के आणि  जे कर्मचारी ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या घर भाडेbhatta हा दहा टक्के होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात जर शासनाने हा निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.

 

Ajay Patil