Exclusive

Maratha Reservation : पाच हजार पुरावे सापडले, आता खेळ बंद करा’ मनोज जरांगे पाटलांचा अहमदनगरच्या सभेत मोठा घणाघात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Maratha Reservation :- मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात चांगलेच वातावरण तापले आहे. मनोज जरांगे हे सध्या ठिकठिकाणी सभा घेत आहेत. काल ते अहमदनगर जिल्ह्यात होते. शनिवारी रात्री अहमदनगर येथील नवनागापुर एमआयडीसी येथे सभा झाली.

या सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीला पाच हजार पुरावे सापडले आहेत. सरकारने हा खेळ थांबवून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे.
उपोषण मागे घेताना सरकारने मराठा आरक्षणासाठी ३० दिवसांची मुदत मागितली होती.

त्यांना आणखी १० दिवस म्हणजे ४० दिवसांची मुदत दिलेली आहे. ३० दिवसांचा हा कालावधी १४ ऑक्टोबरला संपतोय. यामुळे आता वरिष्ठ पातळीवर देखील मोठ्या हालचाली सुरु आहे. ही समिती मुंबई, हैदराबाद आणि संभाजीनगर येथे प्रामाणिकपणे काम करत आहे. आरक्षणाबाबतचे पाच हजार पुरावे या समितीला सापडले असल्याची माहिती आम्हाला मिळालीये.

मराठा समाजाची एकजूट झाली आहे. ही एकजूट जाऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मराठ्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. – मनोज जरांगे पाटील

पाच हजार पुरावे हाच सर्वात मोठा आधार

कोणताही कायदा करायचा म्हटलं की, त्याला सक्षम आधाराची गरज असते. आता पाच हजार पुरावे हाच सर्वात मोठा आधार असून त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे. मराठा समाज एकवटला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज शांत बसणार नाही. सरकारने बैठकीसाठी किती लोक आलेत हे पाहू नये तर त्यांच्या वेदना समजावून घ्याव्यात असेही ते म्हणाले.

आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली !

14 तारखेला सरकारची मुदत संपत आहे. त्याबरोबर मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहचली असून अंतिम धक्क्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी येथे केले.

दुपारी दोन वाजता होणारी पाथर्डीतील सभा रात्री साडेनऊ वाजता सुरु झाली. सकल मराठा समाजाचे युवक व तालुक्यातून आलेले विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पाथर्डी येथे झालेल्या मराठा आरक्षण सभेत ते बोलत होते. पाथर्डी येथील स्व.वसंतराव नाईक चौकात जरांगे यांचे स्वागत सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले. जरांगे व त्यांच्या सहकार्यांचे जेसीबीने फुले उळधळून व फटाक्यांची आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले.

तालुक्यातील विविध गावांत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महिला व पुरुषांनी फुलांची उधळण करत स्वागत केले. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी पाथर्डी परिसर दणाणून गेला होता.

काहीही झाले तरी मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शासनाला शांत बसू देणार नाही. ओबीसी प्रमाणपत्र सर्वांना मिळवूनच राहू. मराठा आरक्षणाचा आपला लढा शांततेच्या मार्गाने चालू ठेवा. माझ्या कोणत्याही बांधवाने यासाठी आत्महत्या करू नये, अशी विनंती जरांगे यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24