Exclusive

Home Remedies For Ants: करा ‘हे’ घरगुती उपाय आणि घरातून मिनिटात पळवा लाल मुंग्या,वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Home Remedies For Ants:- घरामध्ये तुम्ही कितीही स्वच्छता ठेवली तरी सुद्धा बऱ्याचदा आपल्याला झुरळ आणि लाल मुंग्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रामुख्याने या दोन्ही कीटकांचा प्रादुर्भाव जर पाहिला तर हा स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणावर दिसतो. त्यातल्या त्यात लाल मुंग्यांचा वावर किंवा लाल मुंग्यांमुळे सर्वात जास्त नुकसान हे गोड पदार्थांना जास्त प्रमाणात होत असतो.

कोणताही ऋतू राहिला तरी देखील तुम्हाला घरामध्ये लाल मुंग्यांची रांग ही दिसतेच. त्यामुळे लाल मुंग्या असो किंवा झुरळ यांच्या नियंत्रणासाठी आपण अनेक प्रकारचे उपाययोजना करतो. परंतु यामुळे नियंत्रण मिळतेच असे नव्हे. कधी कधी आपल्याला देखील लाल मुंग्या चावा घेतात व त्या जागेवर प्रचंड प्रमाणात खाज येते व बराच त्रास होण्याचा संभव असतो.

अशा परिस्थितीत या त्रासदायक अशा लाल मुंग्यांचा बंदोबस्त होणे खूप गरजेचे असते. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये घरातील लाल मुंग्या मिनिटात पळतील त्यासाठी आवश्यक असणारे काही घरगुती उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्यामुळे लाल मुंग्यांचे उच्चाटन हे तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी होऊ शकते.

 हे घरगुती उपाय ठरतील लाल मुंग्यांच्या नियंत्रणासाठी महत्त्वाचे

1- व्हाईट व्हिनेगर आणि पाणी लाल मुंग्यांच्या नियंत्रणासाठी व्हाईट विनेगर आणि पाणी हा घरगुती उपाय खूप प्रभावी आहे. यामध्ये तुम्ही पाण्यात व्हाईट व्हीनेगर टाकून त्याच्या मिश्रणाचा स्प्रे मुंग्यांवर करू शकता. याकरिता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत अर्धा कप पाणी आणि अर्धा कप व्हाईट विनेगर टाकून मिश्रण करावे व त्याचा स्प्रे मुंग्यांवर करावा. यामुळे मुंग्या ताबडतोब पळतात.

2- लिंबूचा रस आणि पाणी लिंबूचा रस आणि पाणी याचे मिश्रण देखील लाल मुंग्यांच्या नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. याकरिता एका लिंबूचा रस मध्ये तीन कप पाणी मिसळावे आणि स्प्रे बाटलीमध्ये ते भरून घ्यावे. त्यानंतर घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्यांची रांग दिसेल किंवा मुंग्या दिसतील त्या ठिकाणी स्प्रे करावा. यामुळे देखील मुंग्या नाहीशा होतात.

3- बोरिक ऍसिड बोरिक एसिड हे मुंग्यांच्या  नियंत्रणासाठी खूप फायदेशीर असून हे एक मुंग्यांसाठी विषारी म्हणून काम करते. घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्यांचा वावर जास्त प्रमाणात दिसतो अशा ठिकाणी तुम्ही बोरिक ऍसिडचा स्प्रे करावा. याशिवाय तुम्ही बोरिक ऍसिड शुगर ट्रॅप देखील बनवू शकतात. हा ट्रॅप बनवण्याकरिता तुम्हाला बोरिक ऍसिड मध्ये शुगर सिरप मिक्स करावे लागेल आणि हे मिश्रण एका कार्डबोर्डवर टाकावे. या बोर्डकडे मुंग्या आकर्षित होतात व त्या ठिकाणी येऊन मरतात.

4- डिश वॉश आणि पाणी एका बाटलीमध्ये तुम्ही डिश वॉश घ्यावे व त्यामध्ये काही प्रमाणात पाणी टाकावे. त्यानंतर हे मिश्रण चांगले हलवून घ्यावे. घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मुंग्यांची रांग दिसेल त्या त्या ठिकाणी या मिश्रणाचा स्प्रे करावा. या स्प्रेमुळे काही मिनिटात मुंग्या नाहीशा होतात.

अशाप्रकारे तुम्ही हे चार अगदी सोपे घरगुती उपाय केले तर घरातून मुंग्यांचे उच्चाटन कायमस्वरूपी करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil