Exclusive

How To Become Crorepati: गुंतवणूक करून कोट्याधीश व्हायचंय? हे वाचाच….

Published by
Ajay Patil

  How To Become Crorepati:  कष्टाने कमवलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक ही तुमच्या भविष्यकालीन दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. गुंतवणूक करताना तुमची गुंतवणूक सुरक्षित राहणे आणि केलेल्या गुंतवणुकीतून उत्तम असा परतावा मिळणे ही सर्वसामान्य इच्छा प्रत्येक गुंतवणूकदाराची असते. परंतु वयाच्या योग्य टप्प्यावर गुंतवणूक करणे सुरू करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर बरेच जण अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात.

गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध असल्यामुळे यामध्ये बऱ्याच प्रमाणात आता सहजता देखील आलेली आहे. परंतु गुंतवणूक करताना ती दीर्घकालासाठी करणे खूप गरजेचे असते जेणेकरून तुम्हाला खूप मोठा परतावा या माध्यमातून मिळू शकतो. या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये महिन्याला सहा हजार रुपये म्हणजेच दररोज दोनशे रुपये तुम्ही बचत केली तर या बचतीमध्ये तुम्हाला करोडपती करण्याची क्षमता आहे.

 वर्षाला 72 हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती

गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असताना जर आपण काही फायनान्शिअल एक्सपर्ट आणि प्लॅनर्स त्यांच्या मताचा विचार केला तर त्यांच्यानुसार जर व्यक्तीने दररोज दोनशे रुपयांची बचत केली म्हणजे त्याच्या एका महिन्यात सहा हजार रुपये वाचतात. याप्रमाणे वर्षाला हा आकडा 72 हजार रुपये इतका होतो. जर 72 हजार रुपये व्यक्तीने पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि दुसरे म्हणजे एस आय पी म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवले तर नक्कीच फायदा होऊ शकतो.

 पीपीएफ मधील गुंतवणूक

यामध्ये काही कन्सर्व्हेटिव्ह गुंतवणूकदार त्यांचे पैसे पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी यासारख्या सरकारी गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवू शकतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे यासारख्या योजनेमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि परिपक्वतेवर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त आहे.

यामध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला सहा हजार याप्रमाणे वर्षाला जर ७२ हजार रुपयांची गुंतवणूक केली व ती नियमितपणे केली तर पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचे 19 लाख 52 हजार 740 रुपये जमा होतात. पीपीएफ चा परिपक्वता कालावधी हा कमीत कमी पंधरा वर्षाचा आहे.

या व्यतिरिक्त तुम्ही याच योजनेमध्ये जर वीस वर्षांकरिता गुंतवणूक केली तर तुम्ही जमा केलेली रक्कम ही साधारणपणे 31 लाख 95 हजार 978 रुपये इतकी होते. यामध्ये जर आणखी पाच वर्षांची वाढ केली तर 49 लाख 47 हजार 847 रुपये रुपये तुम्हाला मिळतील. ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना असून दर तीन महिन्यांनी या योजनेचा व्याजदर निश्चित केला जातो. सध्याची ही जी आकडेवारी करण्यात आली आहे ती 7.1% सध्याच्या व्याजदरानुसार करण्यात आली आहे.

 म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

तसेच दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमची बचत किंवा गुंतवणूक म्युच्युअल फंड एस आय पी मध्ये पंचवीस वर्षांकरिता दरमहा जमा केली तर तुमचे गुंतवणुकीचे मूल्य हे 80 लाख 27 हजार 342 रुपये होते. ही गणना दहा टक्के वार्षिक परताव्यानुसार करण्यात आलेली आहे. यामध्ये जर पाच वर्षांची वाढ करून तीस वर्षे गुंतवणूक केली तर परतावा एक कोटी 36 लाख 75 हजार 952 रुपये होतो.

गुंतवणूक तज्ञांच्या मते 10% परतावा हा अतिशय सामान्य असतो. डायव्हर्सीफाईड फंडामध्ये 12 टक्के रिटर्न मिळणे सामान्य आहे. यानुसार पंचवीस वर्षांमध्ये ही रक्कम एक कोटी तेरा लाख पंच्याऐंशी हजार आठशे अकरा रुपये आणि 30 वर्षांमध्ये यामध्ये वाढ होते व हे रक्कम वाढून दोन कोटी अकरा लाख 79 हजार 483 रुपये होते. अशा पद्धतीने या दोन्ही पर्यायांमध्ये चांगला परतावा मिळणे शक्य आहे. परंतु गुंतवणूक करताना गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असून त्या पद्धतीने गुंतवणूक करावी हे देखील महत्त्वाचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil