Jyotirling Darshan:- अनेक लोकांना पर्यटनाची हौस असते व पर्यटन हे दोन पद्धतीचे असते.म्हणजे काही व्यक्तींना निसर्ग स्थळे म्हणजेच निसर्गाने समृद्ध असलेली स्थळे तसेच गडकिल्ले पहात फिरण्याचा छंद असतो तर काही पर्यटकांना अध्यात्मिक ठिकाणी जाऊन पर्यटनाचे हौस असते. पर्यटनाच्या बाबतीत विचार केला तर भारतीय रेल्वेकडून देखील अनेक पॅकेज देऊन काही यात्रा आयोजित केल्या जातात व या निमित्तानेच भारतीय रेल्वे कडून भारत गौरव टुरिस्ट ट्रेन काही दिवसांपासून चालवण्यात येत आहे.
वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी भारत गौरव ट्रेन च्या माध्यमातून पर्यटकांसाठी खूप चांगली संधी आहे. यामध्ये धार्मिक प्रवास करण्याची संधी देखील भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते. गौरव भारत ट्रेनने धार्मिक प्रवास घडवण्याच्या उद्दिष्टातून भारतातील सात महत्त्वाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
रेल्वेच्या माध्यमातून घ्या सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतातील महत्त्वाच्या अशा धार्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ज्योतिर्लिंगांना भेट देण्याचा विचार करत रेल्वेने खास पॅकेज आणले असून या अंतर्गत तुमच्या खिशाला परवडेल अशा तिकीट दरामध्ये सात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची सुवर्णसंधी निर्माण करून दिलेली असून आयआरसीटीसीच्या माध्यमातून ट्विट करून या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
या धार्मिक प्रवासामध्ये दिव्य अशा सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून ही यात्रा 17 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे व या भारत गौरव पर्यटक ट्रेन द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेसाठी सात ज्योतिर्लिंग यात्रा या नावाने पॅकेज देण्यात आलेली आहे. या पॅकेज मध्ये 9 रात्री व दहा दिवसांचे पॅकेज असणार असून एकूण 767 बर्थ असणार आहेत. तसेच 49 जागा या आराम वर्गाच्या व स्टॅंडर्ड क्लासमध्ये 70 आणि इकॉनोमिक क्लासमध्ये 668 जागा असणार आहे.
या ज्योतिर्लिंगाचे घेता येईल दर्शन
या पॅकेज अंतर्गत भाविकांना गोरखापूर- ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग, भेत द्वारका, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग चे दर्शन घेऊन परत गोरखपूर असा प्रवास पूर्ण होणार आहे.
किती आहेत तिकीट दर?
या पॅकेजमध्ये जे प्रवासी आराम वर्गातील असतील त्यांना सेकंड एसी क्लास मध्ये प्रवास करावा लागणार असून यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रतिव्यक्ती 42 हजार दोनशे रुपये इतका खर्च येणार आहे. याशिवाय स्टॅंडर्ड क्लासच्या प्रवाशांना थर्ड एसीमध्ये प्रवास करावा लागणार असून या प्रवाशांकरिता प्रति व्यक्ती एकतीस हजार आठशे रुपये एवढा खर्च येणार आहे.
तसेच इकॉनोमिक क्लास मधील जे काही प्रवासी असतील ते स्लीपर ट्रेनमध्ये प्रवास करणार असून त्यांचे भाडे 18 हजार 950 रुपये प्रति व्यक्ती असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला रेल्वे कडून सुलभ हप्ते अर्थात ईएमआय पर्यायाची सुविधा देखील देण्यात येणार आहे. त्याबद्दलची तुम्हाला जास्तीची माहिती हवी असेल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेऊ शकतात.