Little JhunJhunwala :- ज्या वयात मुले वडिलांच्या पैशावर ऐश करतात तेव्हा तो हजारो-लाखो रुपये कमावण्यात मग्न होता. दिवसरात्र कष्ट केले अन त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. आज तो १०० कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे. आपण येथे लिटिल झुनझुनवाला अर्थात संकर्ष चंदा याबद्दल महिती पाहणार आहोत.
हैद्राबाद मधील रहिवासी असणाऱ्या संकर्ष चंदा याची कहाणीच निराळी आहे. तो शिकण्यासाठी घरातून बाहेर गेला होता पण तो शेअर बाजाराकडे इतका आकर्षित झाला की त्याने मागे वळून पाहिलंच नाही. बाजारात पैसे गुंतवण्याबाबत त्यानं कधी ते मागेपुढे पहिले नाही. २ हजारांपासून त्याने सुरवात केली आज त्याने करोडो रुपये कमावले.
स्टॉक ट्रेडिंगच्या माध्यमातून नशीब चमकले
शेअर बाजारात दोन हजार रुपयांपासून त्याईनं सुरवात केली. पाहता पाहता त्याने शेअर बाजारात अल्पावधीतच १०० कोटींचा टप्पा ओलांडला. लिटिल झुनझुनवाला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संकर्षने शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून आपले नशीब कमावले.
त्याने शेअर बाजारातून १०० कोटी रुपये कमावले आहेत. शेअर बाजारात अनेकांना तोटा सहन करावा लागतो. पण त्याच्याबाबतीत तसे घडले नाही. वयाच्या १७ व्या वर्षी या व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या संकर्षने पहिल्यांदा दोन हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यावेळी ते ग्रेटर नोएडाच्या बेनेट विद्यापीठातून B.Tech करत होते. दुसऱ्या वर्षी शिक्षणात त्याने ब्रेक घेतला. त्यानंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ स्टॉक ट्रेडिंगमध्ये देण्याचा निर्णय घेतला.
शिक्षणात ब्रेक
एकदा एका मुलाखतीदरम्यान संकर्षने सांगितले की, मी दोन वर्षांत दीड लाख रुपये शेअर बाजारात गुंतवले. या काळात माझ्या शेअर्सचे बाजारमूल्य 13 लाख रुपये झाले. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ बेंजामिन ग्रॅहम यांचा लेख वाचून शेअर बाजाराकडे झुकल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रॅहम वयाच्या १४ व्या वर्षी ‘फादर ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ म्हणून ओळखले जात होते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त वेळ त्यावर संशोधनासाठी दिला. अभ्यास आणि शेअर बाजार या दोन्ही गोष्टी सांभाळता न आल्याने त्याने शिक्षणात ब्रेक घेणे गरजेचे समजले.
फिनटेक स्टार्टअप
शेअर बाजारातील दमदार कामगिरीनंतर संकर्षने आपला स्टार्टअप सुरू केला. त्यांच्या स्टार्टअपचे नाव स्वबोध इन्फिनिटी इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. स्टार्टअप सुरू करण्यासाठी, संकर्षने २०१७ मध्ये ८ लाख रुपयांना शेअर्स विकले होते.
स्टार्टअपने पहिल्या वर्षी १२ लाख रुपये, दुसऱ्या वर्षी १४ लाख रुपये, तिसऱ्या वर्षी ३२ लाख रुपये आणि २०२०-२१ मध्ये ४० लाख रुपये कमाई केली. स्टार्टअपद्वारे कमावलेले पैसे त्यांनी पुन्हा गुंतवले. अशा प्रकारे तो आज एका मोठ्या साम्राज्याचा मालक आहे. अलीकडेच त्याने सांगितले की माझी एकूण संपत्ती १०० कोटी रुपये आहे.