Exclusive

शरद पवार VS अजित पवार कोण कोणासोबत वाचा संपूर्ण यादी ! Maharashtra Politics Breaking

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Maharashtra Politics Breaking :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे.अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. त्यानंतर अजित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

 

शरद पवार यांच्यासोबत कोणते आमदार राहिले
जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), राजेश टोपे (घनसावंगी), अनिल देशमुख (काटोल), जयंत पाटील (इस्लामपूर), बाळासाहेब पाटील (अहमदपूर), शामराव पाटील (कराड उत्तर), प्रकाश सोळंके (माजलगाव), राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा), नवाब मलिक (अणुशक्ती नगर), प्राजक्त तनपुरे (राहुरी), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तुमसर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), दीपक चव्हाण (फलटण), अशोक पवार (शिरूर), मकरंद जाधव (वाई), चंद्रकांत नवघरे (बसमत), इंद्रनील नाईक (पुसद), मानसिंग नाईक (शिराळा), नितीन पवार (कळवण), रोहित पवार (कर्जत जामखेड), राजेश पाटील (चंदगड), सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ), दिलीपराव बनकर (निफाड), यशवंत माने (मोहोळ), बबनराव शिंदे (माढा) संदीप क्षीरसागर (बीड)

अजित पवार यांच्यासोबत कोणते आमदार गेले ?
अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), धर्मराव बाबा आत्राम (अहेरी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), आदिती तटकरे (श्रीवर्धन) ,दत्तात्रय भरणे (इंदापूर), दौलत दरोडा (शहापूर), शेखर निकम (चिपळूण), सरोज अहिरे (देवळाली), किरण लहामटे (अकोले), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), निलेश लंके (पारनेर) , सुनील भुसारा (विक्रमगड), अतुल बेनके (जुन्नर), संग्राम जगताप (अहमदनगर), आशुतोष काळे (कोपरगाव), चेतन तुपे (हडपसर), सुनील शेळके (मावळ), अण्णा बनसोडे (पिंपरी), दिलीप मोहिते (खेड आळंदी)

अहमदनगर लाईव्ह 24