Categories: Exclusive

Pune Metro News : पुण्यात होतंय 11 एकर जागेत तब्बल 108 फूट खाली भूमिगत मेट्रो स्थानक ! काय असतील सुविधा वाचा संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या एक ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्याकरिता येणार असून या दरम्यान ते पुणे मेट्रो मार्गाचे देखील उद्घाटन करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या उद्घाटनामध्ये फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या मेट्रो मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

हे दोन्ही मेट्रो मार्गांचे काम सध्या पूर्ण झाले असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी शनिवारी या मार्गाची अंतिम पाहणी देखील पूर्ण केलेली आहे. पाहणी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मेट्रोमार्गांना ग्रीन सिग्नल दिला आहे. जर आपण पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गाचा विचार केला तर हा 17 किलोमीटर लांबीचा मार्ग असून वनाज ते रामवाडी हा दुसरा मार्ग 16 किलोमीटर लांबीचा आहे. जर आपण या दोनही मार्गिकांचे वैशिष्ट्ये पाहिले तर ते सिविल कोर्ट मेट्रो स्थानक या ठिकाणी एकमेकांना छेदतात.

त्यामुळे या मेट्रो स्टेशनचे खूप महत्त्व आहे. हे मेट्रो स्टेशन पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गेकेवरील हे भूमिगत स्टेशन असून वनाज ते रामवाडी या मार्गीके वरील एक उन्नत स्थानक देखील आहे. हे भूमिगत स्थानक आणि उन्नत स्थानक एकमेकांना एस्कीलेटर  आणि लिफ्ट यांनी जोडले गेले आहे.

 सिविल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची वैशिष्ट्ये

हे एक वैशिष्ट्यपूर्णरित्याने उभारण्यात आलेले मेट्रो स्थानक असून याची खोली 33.1 मीटर म्हणजे साधारणपणे 108.59 फूट इतकी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे भारतातील सर्वात खोल असे मेट्रो स्थानक आहे. तसेच याची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फुट इतके उंच असून या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश व एखादा नैसर्गिक प्रकाश पडेल अशा पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे

व महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारची वैशिष्ट्ये असणारे हे देशातील एकमेव असे मेट्रोस्थानक आहे. तसेच या स्थानकावर डेंगळे पूल तसेच कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा न्यायालय या परिसरातील प्रवाशांना येता जाता यावे याकरिता पादचारी वा वाहतुकीच्या सोयी देखील करण्यात आलेले आहे.

महत्वाचे म्हणजे सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी या दरम्यान पुण्यामध्ये जी काही तिसरी मेट्रो मार्गी का बांधण्यात येणार आहे ती देखील या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे हे मेट्रो मार्गाचे मध्यवर्ती स्थानक म्हणून ओळखले जाणार हे मात्र निश्चित. या स्थानकामध्ये आठ लिफ्ट आणि 18 एस्कीलेटर बसवण्यात आलेले आहे. सिविल कोर्ट इंटरचेंज मेट्रोस्थानात हे 11.17 एकर परिसरामध्ये असून या स्थानकामध्ये येता जाता यावे याकरिता सात दरवाजे बसवण्यात येणार आहे.

पार्किंगची देखील उत्तम सुविधा या ठिकाणी उभारण्यात आली असून ड्रॉप अँड गो साठी एक स्पेशल लेन देखील असणार आहे. तसेच मल्टी मॉडेल इंटिग्रेशन करिता  पीएमपीएमएल चा थांबा देखील या ठिकाणी असणारा असून या संपूर्ण परिसराचे स्वरूप हे अत्यंत देखणे व आकर्षक असे करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध प्रकारचा हरित पट्टा तसेच झाडे व कारंजा व आकर्षक झाडी देखील लावण्यात येणार असून त्यामुळे हा परिसर येणाऱ्या काळात खूप आकर्षक दिसेल हे मात्र निश्चित.

Ajay Patil

Published by
Ajay Patil