Exclusive

Spray Machine: फवारणीकरिता आता नाही मजुरांची चिंता! सुशिक्षित युवकाने केला देशी जुगाड आणि बनवले यंत्र

Published by
Ajay Patil

Spray Machine :- शेतीची अशी अनेक कामे आहेत की जे एकट्या व्यक्तीला करता येणे शक्यच नाही. म्हणजेच तण नियंत्रणाकरिता करायची निंदनी असो किंवा पिकाला कीड व रोग नियंत्रणाकरिता करायचे असलेले फवारणी असो याकरिता मजुरांची आवश्यकता भासतेच. परंतु सध्या कालावधीमध्ये मजुरांची टंचाई हा खूप मोठा गंभीर प्रश्न शेती समोर आहे. मजूर टंचाई आणि मजुरीचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांना खूपच मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो व त्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून नक्कीच नफ्यावर परिणाम होताना दिसून येतो.

त्यातल्या त्यात मजूर वेळेवर मिळत नसल्यामुळे आवश्यक कामे देखील वेळेत होत नाही व त्याचा देखील फटका हा उत्पादनावर बसतो. आता मजूरटंचाईवर रामबाण उपाय म्हटला म्हणजे यंत्रांचा वापर हा एकच पर्याय शिल्लक राहतो. त्यामुळे यंत्रांचा वापर करण्याकडे आता शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल आहे.

फवारणी आणि आंतरमशागती करिता अनेक यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. परंतु या ठिकाणी देखील एक समस्या आहे व ती  म्हणजे त्या यंत्रांची असलेली किंमत ही शेतकऱ्याला परवडण्यासारखी नाही. जास्त क्षेत्र असलेले शेतकरी यंत्र घेऊ शकतात व त्यांना क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ते परवडते.

परंतु कमी जमीन धारणा क्षेत्र असलेले शेतकऱ्यांना अशा कामांकरिता यंत्रांची खरेदी करणे परवडत नाही. मग यातूनच काही शेतकरी त्यांच्या संशोधक वृत्तीचा  आणि बुद्धीचा वापर करून काहीतरी जुगाड करतात व मोठ्या शेतकऱ्यांप्रमाणेच लहान शेतकऱ्यांना देखील उपयोगी ठरतील असे यंत्रे विकसित करतात. अगदी त्याच पद्धतीने जर आपण नंदूरबार जिल्ह्यातील एका तरुणाने बीएससी ॲग्रीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे व या सुशिक्षित युवकाने फवारणीसाठी वापरता येईल असे एक यंत्र बनवले असून नक्कीच ते शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार आहे.

 जुगाड करून तयार केले फवारणी यंत्र

कमलेश चौधरी हे नंदुरबार जिल्ह्यातील एक युवा शेतकरी असून त्यांचे शिक्षण बीएससी ऍग्री पर्यंत पूर्ण झालेले आहे. या कृषी क्षेत्रातील शिक्षणाचा उपयोग त्यांनी घरच्या शेतीत करण्याचे ठरवून शेती करण्याचे निश्चित केले. परंतु जेव्हा त्यांनी शेती करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मजूर टंचाईची समस्या ही शेती पुढील एक मोठी समस्या आहे यामुळे बऱ्याच प्रकारचे नुकसान शेतकऱ्यांना होत असते.

त्यातल्या त्यात फवारणीला मजूर मिळत नसल्यामुळे खूप मोठी अडचण  येते व त्याचा परिणाम हा उत्पादन घटीवर दिसून येतो. मग या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली व घरच्या वस्तूंचा वापर करून स्प्रे बूम मशीन फवारणी यंत्र विकसित करण्याचे ठरवले व ते विकसित देखील केले.

त्यांनी विकसित केलेले हे स्प्रे बूम मशीन फवारणी यंत्र 27 फूट उंच असून या यंत्राच्या साह्याने 50 ते 60 एकर क्षेत्रावर तुम्हाला एक दिवसात फवारणी करता येणे शक्य आहे. तसेच एक एकर क्षेत्रावर फवारणी करायचे असेल तर फक्त पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी याला लागतो. म्हणजे या यंत्रामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा झाला तो म्हणजे शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचणार आहे आणि खर्चात बचत होऊन काम देखील वेळेवर होणार आहे.

 अशा पद्धतीने तयार केले यंत्र

हे स्प्रे बूम मशीन फवारणी यंत्र तयार करण्याकरिता त्यांनी सोशल मीडियावरील विविध प्रकारच्या माहितीचा शोध घेतला व त्याची संपूर्ण माहिती गोळा करून हे जुगाड यंत्र बनवले. याकरिता ट्रॅक्टरचे मोठे टायर काढून घेत कमलेश चौधरी यांनी 18 एमएम आणि 13 एमएम इंचचा टायर या यंत्राला वापरले. या यंत्राच्या मागच्या बाजूला पंप बसवला आणि पुढील बाजूस 27 फूट रुंदीचे फवारणी यंत्र बसवून ते ट्रॅक्टरच्या साह्याने यंत्र वापरून फवारणी करता येणे शक्य झाले.

अशा पद्धतीने कमलेश चौधरी यांनी हे यंत्र तयार केले व याचा फायदा आता आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. तसेच मजुरांमुळे जो काही फवारणीला खर्च येत होता किंवा फवारणी वेळेवर होत नव्हती त्या शेतकऱ्यांना देखील आता खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचे देखील त्या ठिकाणचे शेतकरी सांगतात.

Ajay Patil