Exclusive

महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय भूकंप ! अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री ! Maharashtra Politics Live Updates

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Maharashtra Politics Live Updates :- महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत.अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे

अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवारांचा पाठिंबा नाही
शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचं सांगण्यात येत आहे.शरद पवार यांचा या शपथविधी सोहळ्याला पाठिंबा नसल्यामुळे आता राजकारणाची पुढची दिशा कशी असेल हे पहावं लागणार आहे.

शरद पवार यांना मोठा धक्का
शरद पवार यांचे निकटवर्तीय असेलेले हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे नेते अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

हे नेते फुटले

दिलीप वळसे पाटील,
हसन मुश्रीफ,
छगन भुजबळ,
किरण लहमटे
निलेश लंके,
धनंजय मुंडे,
रामराजे निंबाळकर,
दौलत दरोडा,
मकरंद पाटील,
अनुल बेनके,
सुनील टिंगरे,
अमोल मिटकरी,
आदिती तटकरे,
शेखर निकम,
निलय नाईक,
अशोक पवार,
अनिल पाटील,

अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटासोबत जाऊ नये म्हणून सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. पण अजित पवार यांनी कुणाचं ऐकलं नाही. बैठकीनंतर ते तडक आमदारांना घेऊन ते राजभवनावर गेले आहेत.

शरद पवारांशी बोलणं झालं, म्हणाले मी खंबीर आहे !

राज्यातील घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शरद पवारांशी बोलणं झालं, म्हणाले मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.”

अहमदनगर लाईव्ह 24