Exclusive

डाळिंब,आंबा,चिकू लागवडीतून वर्षाला 40 लाखाचे उत्पन्न! कसे नियोजन आहे या शेतकऱ्याचे? वाचा ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

कुठल्याही व्यवसायाचे जर तुम्ही योग्य नियोजन केले आणि व्यवस्थित तपशीलवार अभ्यास करून सुरुवात केली तर यश मिळते. व्यवसायातील सगळ्या प्रकारचे खाचखळगे ओळखून संबंधित व्यवसायामध्ये पडणे कधीही फायद्याचे असते. अगदी हीच बाब शेती व्यवसायाला देखील लागू होते. तुमच्याकडे जर जास्त शेती असेल तर एकच पीक न घेता त्यामध्ये वैविध्य असणे खूप गरजेचे आहे.

तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्यवस्थित करणे आणि खर्च कमीत कमी करून उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे  हे शेती व्यवसायातील यशाचे गमक आहे. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण राजस्थान मधील श्रवण सिंह नावाच्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर ती खरंच आश्चर्यकारक अशी आहे. त्यांचेच यशोगाथा या लेखात बघू.

 श्रवण सिंह यांचे शेतीचे नियोजन

राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील शेतकरी पवन सिंह हे शेतकरी सुशिक्षित असून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. विशेष म्हणजे शेती व्यवसायात येण्याच्या अगोदर ते रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करत होते. परंतु तो व्यवसाय बंद करत श्रवण यांनी शेतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला व फळबागा लावण्याचे निश्चित केले.

त्यानंतर त्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धत वापरून लिंबू, डाळिंब तसेच आंबा, चिकू आणि काकडी इत्यादींची लागवड केली. विशेष म्हणजे या पिकांच्या व्यवस्थित नियोजनातून त्यांनी भरघोस उत्पादन मिळवले व वार्षिक 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यापर्यंत त्याची आता मजल गेली आहे.

 12 हेक्टर लिंबूनेच दिले लाखो रुपये

श्रवण सिंग यांनी फळबाग लागवड करण्याचा निश्चय केला व हळूहळू फळबाग लागवडीचे क्षेत्र ते वाढवत गेले. तिसऱ्या वर्षी त्यांनी 18 लाख रुपयांचा फायदा मिळवला. यामध्ये 2011 मध्ये त्यांनी लिंबूची लागवड केली व 2013 मध्ये डाळिंबाची लागवड केली. 2015 मध्ये त्यांना डाळिंबाचे उत्पादन मिळाले. त्यांनी उत्पादित केलेले दर्जेदार डाळिंब बांगलादेश, नेपाळ आणि दुबई या ठिकाणी पाठवले.

विशेष म्हणजे प्रयोग शाळेमध्ये टेस्टिंग केल्यानंतरच फळे ते विदेशात पाठवतात. एवढेच नाही तर सुपर मार्केट, रिलायन्स फ्रेश आणि इरिगेशन सारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांना देखील ते फळे पुरवतात.त्यांनी डाळिंबाची 5000 रोपांची लागवड केली असून दुसरे पाच हजार झाडे त्यांनी त्यांच्या भावाच्या फार्म हाऊसवर लागवड केली आहेत. एवढेच नाही तर तैवान पिंक पेरू, केसर जातीच्या आंब्याची लागवड देखील त्यांनी केली असून ही संपूर्ण शेतीचे नियोजन सेंद्रिय पद्धतीने करतात.

 आता द्राक्ष लागवड करण्याचा आहे प्लान

इतके प्रकारचे फळबागा लावून आता त्यांनी द्राक्ष लागवडीचा प्रयोग करण्याचे ठरवले असून डाळिंब तसेच लिंबू, पेरू विक्रीतून ते दरवर्षी 40 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवतात. तरी त्यांनी आता द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला असून त्यासाठीचे नियोजन त्यांनी सुरू केलेले आहे.

Ajay Patil