Exclusive

Train Information: रेल्वेच्या डब्यावर बाहेर पाच अंकी क्रमांक लिहिलेला असतो! काय आहे त्यामागील गुपित? आहे का तुम्हाला माहिती?

Published by
Ajay Patil

Train Information:- भारतीय रेल्वे ही भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून देशाच्या उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून तर पूर्वेपर्यंत भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात आणि अनेक मालाची वाहतूक देखील रेल्वेच्या माध्यमातून केली जाते.

तसेच रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि आरामदायी असल्यामुळे अनेक प्रवासी लांबच्या प्रवासाकरिता रेल्वेला पसंती देतात. रेल्वे ही प्रवासाच्या दृष्टिकोनातून जितकी प्रवाशांना महत्त्वाची आहे तितकीच ती काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल देखील वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. रेल्वे बद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी अजून देखील माहित नाहीत.

उदाहरणच घ्यायचे झाले तर रेल्वेच्या डब्यांवर आपल्याला दरे, मरे, परे असे शब्द लिहिलेले असतात. परंतु बऱ्याच जणांना त्यांचा अर्थ माहित नसतो. या शब्दाचा अर्थ पाहिला तर दरेचा अर्थ होतो दक्षिण रेल्वे, मरेचा अर्थ होतो मध्य रेल्वे म्हणजेच अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला माहीत नसतात.

यासोबतच या शब्दांप्रमाणेच रेल्वेच्या डब्यांवर  बाहेरच्या बाजूला एक पाच आकडी क्रमांक लिहिलेला असतो. हा क्रमांक आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलेला असेल. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की या अंकांचा अर्थ काय होत असेल? जर तुम्हाला याबाबत माहिती घ्यायची असेल तर याबद्दलची सगळी माहिती या लेखात घेऊ.

 काय होतो रेल्वेच्या डब्यांवरील पाच आकडी क्रमांकाचा अर्थ?

रेल्वेच्या डब्यांवर बाहेरील बाजूला पाच आकडी क्रमांक ठळकपणे दिसेल असा लिहिलेला असतो. जर आपण या पाच अंकांचा विचार केला तर यातील सुरुवातीचे जे काही दोन अंक असतात किंवा आकडे असतात त्यावरून तुम्हाला रेल्वेच्या निर्माणच वर्ष कळतं.

उदाहरणच घ्यायचे झाले तर जर रेल्वेच्या डब्यावर 08054 असा अंक असेल तर त्या रेल्वे कोचेची निर्मिती 2008 मध्ये झाली आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे उरलेल्या तीन क्रमांकाचा देखील वेगळा अर्थ असतो.यामध्ये…

1- 001-025– एसी प्रथम श्रेणीवर, वर्ष 2000/ 2001 मधील काही डबे किंवा कोच

2- 026-050- एक एसी + एसी – दोन टीयर

3- 051-100- एसी दोन टियर

4- 101-150- एसी थ्री टीयर

5- 151-200- सीसी म्हणजेच याचा अर्थ होतो एसी चेअर कार

6- 201-400- म्हणजेच या तीन अंकांच्या डबा हा सेकंड स्लीपर म्हणजेच द्वितीय श्रेणी स्लीपर असतो.

7- 401-600- या तीन अंकांच्या दरम्यान जर डब्यावर अंक असेल तर तो डबा जनरल श्रेणी म्हणजेच सामान्य द्वितीय श्रेणीचा डब्बा असतो.

8- 601-700- या तीन अंकांच्या दरम्यानचा शेवटचे तीन अंक असलेला डबा हा 2 एस म्हणजेच द्वितीय श्रेणी सेटिंग / जनशताब्दी चेअर कार असतो.

9- 701-800- या तीन अंकांचा डबा सेटिंग कम लगेज रॅक प्रकाराचा असतो.

10- 801 पासून पुढे या पुढचे अंकांचा डबा हा वीपीयु, आरएमएस मेल कोच, पॅंटी कार, जनरेटर कार इत्यादी प्रकारचा असतो.

तसेच महत्त्वाचे म्हणजे ज्या रेल्वेचा पहिला नंबर शून्याने सुरू होतो ती रेल्वे स्पेशल रेल्वे असते. दिवाळी सारख्या किंवा होळी सारख्या सणाच्या वेळेस अशा रेल्वे चालवल्या जातात. नंबर एक ने सुरुवात होणाऱ्या रेल्वे या एसी  रेल्वे असतात व या कमीत कमी अंतरावर चालवल्या जातात. दोन नंबर असलेल्या रेल्वे जास्त लांब पल्ल्याच्या असतात.

अशा पद्धतीने रेल्वेच्या डब्यांवर लिहिलेल्या या पाचही आकड्यांचा अर्थ होत असतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil