Useful Home Tricks :- घर छोटे असो किंवा मोठे प्रत्येक जण घराच्या स्वच्छतेकडे जातीने लक्ष घालतात. घराची फरशी पुसण्यापासून ते घराला कुठे जाळे लागू नये याकरता देखील प्रत्येक जण काळजी घेत असतो. परंतु बऱ्याचदा आपण घराची काळजी घेतो परंतु आपल्या त्याच घरातील अनेक छोट्या मोठ्या दैनंदिन वापरातल्या वस्तूंकडे मात्र दुर्लक्ष करतो. बऱ्याच दिवस दुर्लक्ष केल्यामुळे अशा वस्तूंचा दर्जा खराब होतो व त्यानंतर आपण जागे होतो व या वस्तू स्वच्छ करण्यामागे लागतो.
परंतु तेव्हा काही प्रयत्न करून देखील अशा वस्तू स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे आपली बऱ्याचदा निराशा होते. अशाच छोट्या वस्तूंच्या अनुषंगाने विचार केला तर आपण घरांमध्ये ज्या काही प्लास्टिकच्या बकेट वापरतो व प्रामुख्याने आंघोळीसाठी वापर करत असलेल्या बकेट व्यवस्थित स्वच्छ केल्या नाहीत तर कालांतराने त्यांच्यावर काळपटपणा चढतो व त्यात काळ्या रंगाच्या दिसायला लागतात.
परंतु आपण अनेक प्रयत्न करतो परंतु ते स्वच्छ होत नाहीत. परंतु आता यामध्ये काळजी करण्याची गरज नसून या लेखामध्ये आपण अशा छोट्या ट्रिक्स बघणार आहोत त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील आंघोळी किंवा इतर कामांसाठी वापरत असलेल्या बादल्या झटक्यात चमकावू शकतात.
वापरा या ट्रिक्स आणि काळ्या पडलेल्या बादल्या चमकवा
1- बेकिंग सोड्याचा वापर– याकरिता तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करून स्वयंपाक घरातील अनेक गोष्टींची स्वच्छता करू शकतात. दोन मिनिटांमध्ये जर तुम्हाला बादल्या स्वच्छ करायचे असतील तर बेकिंग सोडा हा तुमच्यासाठी एक फायदेशीर आणि सोपा पर्याय आहे.बादल्या स्वच्छ करण्याकरिता तुम्ही जर बेकिंग सोड्याचा वापर केला तर दोन मिनिटांमध्ये तुमची बादली स्वच्छ होणार आहे.
याकरिता तुम्हाला बादलीतून घाण पाणी किंवा कपडे असतील ते बाहेर काढून घ्यावेत व एका वाटीत बेकिंग सोडा, डिश वॉश सोफ आणि लिंबाचा रस मिसळून घ्यावा. त्यानंतर घरातील जुना टूथब्रश घ्यावा आणि पेस्ट लावून बादली व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर बादली स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावी. थोडा उपाय केल्याने घरातील बादली पुन्हा नव्या सारखी दिसायला लागते.
2- व्हीनेगरचा वापर– व्हिनेगर चा वापर आपण घाणेरड्या तसेच खराब झालेल्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी करू शकतात. याकरिता तुम्हाला एका वाटीमध्ये एक कप व्हाईट व्हिनेगर घेणे गरजेचे असून त्यामध्ये थोडे पाणी घालावे. तयार झालेल्या मिश्रणामध्ये स्पंज भिजवावा व या स्पंजच्या साह्याने खराब झालेली बादली घासून घ्यावी. या साध्या उपायाने देखील बादली नव्यासारखे चमकू लागते.
3- टूथपेस्टचा वापर– घरातील वापरात नसलेल्या ब्रशवर टूथपेस्ट लावून घ्यावी व त्याने बादली व्यवस्थित घासून घ्यावी. घासून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत बादली तसेच पडू द्यावी व नंतर तिला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावी. ही ट्रिक्स वापरल्याने बादलीवर जो काही पिवळा थर साचलेला असतो तो झटक्यात दूर होतो.
4- लिंबाचा वापर– खराब बदली स्वच्छ करण्याकरता तुम्ही लिंबाचा वापर देखील करू शकतात. याकरता लिंबाचे दोन तुकडे करून एका तुकड्यावर बेकिंग सोडा लावा व त्या तुकड्याने ती बादली व्यवस्थित घासून घ्यावी किंवा बादलीवर लिंबू आणि बेकिंग सोडा लावावा. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांकरिता बादली तसेच ठेवावी व नंतर स्वच्छ पाणी घेऊन ती बादली स्वच्छ करून घ्यावी. या उपायाने देखील बादल्या स्वच्छ होतात.vene