Vivek Bindra Controversy : प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा गेल्या काही दिवसापासून खूपच चर्चेत आहेत. संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात सध्या वाद सुरु आहे. अशातच आता विवेक बिंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ते आता पारिवारिक कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडाच्या सेक्टर-१२६ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नी यानिकाला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांमधून समोर आले आहे.
त्याच्या पत्नीच्या भावाने म्हणजेच त्याचा मेहुणा वैभव क्वात्रा याने त्याच्याविरोधात हा आरोप लगावला आहे. आणि मेव्हण्यानेच पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल केला आहे. FIR मध्ये सांगितल्याप्रमाणे, मारहाणीनंतर बिंद्रा यांच्या पत्नीवर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात अनेक दिवस उपचार सुरू होते.
मारहाणीत तीचा कानाचा पडदा फुटल्याचा आरोप आहे. तसेच त्याने पत्नीचे केसही ओढलेत. महिलेच्या शरीरावर जखमा दिसत आहेत. दरम्यान, नोएडा पोलिसांनी याचा सविस्तर तपास सुरू केला आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत असल्याचे बोलले जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्राने पत्नीला खोलीत बंद करून मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच महिलेच्या कुटुंबीयांनी तिला सोबत घेतले सध्या तिच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खरेतर आधीच बिंद्रा यांच्यावर एका मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. अशातच आता पुन्हा हे प्रकरण समोर आले आहे. यामुळे सोशल मीडियावर विवेक बिंद्रा हे चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे बिंद्रा यांचे लग्न 6 नोव्हेंबरला झाले आहे.
लग्नानंतर सुमारे महिनाभरानंतर 6-7 डिसेंबर रोजी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान विवेकचे आई प्रभासोबत भांडण होत होते. असा आरोप आहे की पत्नी यानिका जेव्हा भांडण मिटवायला मध्ये पडली तेव्हा त्याने तिला खोलीत बंद केले. विवेकने यानिकाला शिवीगाळ केली आणि मारहाण सुद्धा केली आहे. विवेक बिंद्रा यांच्यावर 14 डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.