Vivek Bindra : सध्या बडा बिजनेसचे संस्थापक उद्योजक अन देशातील एक प्रेरक वक्ता विवेक बिंद्रा चर्चेत आहेत. आधीच विवेक बिंद्रावर संदीप माहेश्वरी यांनी एक मोठा स्कॅम केला असल्याचा आरोप केला आहे आणि अशातच त्यांची अडचण आणखी वाढली आहे.
त्याच्यावर त्यांच्या धर्मपत्नीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संदीप माहेश्वरी यांनी बिंद्रा याच्यावर 500 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप लावला आहे. यामुळे घोटाळ्याबाबतही त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला विवेक बिंद्राशी संबंधित अशाच वादग्रस्त प्रकरणांची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मेव्हण्याने दाखल केलाय गुन्हा
बिंद्रावर त्यांच्या मेव्हण्याने गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याच्या पत्नीवर झालेल्या मारहाणीच्या आरोपाचा तपास सुरू आहे. त्याआधारे आता योग्य ती कारवाई केली जाणार आहे. बिंद्राची पत्नी यानिकाच्या भावाने म्हणजे वैभव क्वात्रा याने 14 डिसेंबरला नोएडातील सेक्टर 126 पोलीस ठाण्यात हाणामारी बाबत एफआयआर दाखल केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विवेक बिंद्रा आणि यानिकाचे 6 डिसेंबर रोजी लग्न झाले होते. दरम्यान लग्न झाल्यानंतर एका महिन्याने त्यांच्यावर पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत एफआयआर दाखल झाली आहे.
यामध्ये असे म्हटले आहे की, लग्नाच्या काही तासांनंतर बिंद्राने यानिकाला खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला आहे. बिंद्राने पत्नीचे केस ओढून मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीमुळे यानिकाचे कानाचा पडदा फाटला असून तीला नीट ऐकू येत नाहीये. पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये बिंद्राने यानिकाचा फोन तोडला असल्याचे सांगितले गेले आहे.
संदीप माहेश्वरीने केलेय गंभीर आरोप
मारहाणच्या आरोपाआधी यूट्यूबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर संदीप महेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर ‘घोटाळ्याचे रॅकेट’ चालवल्याचा आरोप केला आहे. यामुळे तेव्हापासूनच बिंद्रा चर्चेत आहेत. महेश्वरीने नुकताच ‘बिग स्कॅम एक्सपोज्ड’ नावाचा एक व्हिडिओ त्याच्या युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध केला होता.
यामध्ये बिंद्रावर मल्टी लेव्हल मार्केटिंगसारखा कोर्स चालवल्याचा आरोप होता. हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचा दावा माहेश्वरीकडून करण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांकडून शिकवणी व्यवसायाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान हा घोटाळा तब्बल 500 कोटीचा असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे बिंद्राने महेश्वरीला कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे सांगितले आहे.