Exclusive

Waterfalls In Maharashtra : पावसाळी पर्यटनाची सुरुवात करा ह्या रम्य धबधब्यासंगे ! एकदा पहाल तर अचंबित व्हाल

Published by
Ajay Patil

  Waterfalls In Maharashtra:   महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव असून महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी तसेच सह्याद्रीच्या डोंगर रांगा यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे महाराष्ट्रात आहे.  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला कोणत्यातरी पर्यटन स्थळाचा वारसा असून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये कायमच पर्यटकांची गर्दी होत असते. अगदी याच पद्धतीने नाशिक जिल्हा हा आध्यात्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समृद्ध असा जिल्हा आहे.

नाशिक जिल्ह्यातील जर आपण पेठ आणि सुरगाणा इत्यादी तालुक्यांचा विचार केला तर  डोंगर रांगा आणि त्या ठिकाणी वाहणाऱ्या नद्या आणि धबधबे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मन मोहुन घेतात. हा परिसराचा विचार केला तर निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर असून या ठिकाणी आता अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत.

या ठिकाणी अनेक प्रकारची निसर्गसौंदर्य बघण्याची संधी मिळते. अगदी याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात काहीसा प्रसिद्धीपासून दूर असलेला परंतु आता प्रसिद्धीस येत असलेला भिवतास  धबधबा आता पर्यटकांना खुणावू लागला असून या ठिकाणी पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढताना दिसून येत आहे.

 भिवतास धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असलेल्या खोकर विहीर या गावाजवळ हा धबधबा आहे. साधारणपणे भिवतास हे ठिकाण सुरगाणा तालुक्यातील खोकर विहीर तसेच केळावण या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी नदीच्या पाण्यातून निर्माण झालेला हा धबधबा साधारणपणे एक हजार फूट खोल दरीत कोसळतो. त्यामुळे आता हळूहळू पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा धबधबा प्रसिद्ध होत असून या ठिकाणी अनेक पर्यटकांची गर्दी होत आहे.

आता सध्या सर्वीकडे पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे या परिसरातील सर्वच लहान मोठी धरणे आणि तलाव भरले असून या ठिकाणचे एकंदरीत वातावरण मनाला प्रसन्न करणारे व अल्हाददायक असे झाले आहे. या ठिकाणी गुजरात राज्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटक भेट देत असतात. जर आपण या धबधब्याचे लोकेशन पाहिले तर नाशिक पासून साधारणपणे 90 किलोमीटर आणि सुरगाणा तालुक्यापासून साधारणपणे पन्नास किलोमीटरवर हा धबधबा आहे.

तसे पाहायला गेले तर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी धबधबे आहेत. परंतु भिवतास हा धबधबा यावर्षी पर्यटकांना भुरळ घालत आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर असलेला हा धबधबा पाण्यासाठी आता पर्यटकांचे खूप मोठी गर्दी होत आहे.

या धबधब्याजवळ परेटीडोह, हंडाहंडी डोह असून हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेला भिवतास धबधबा मात्र अजून देखील  अनेक प्रकारच्या विकासापासून लांब आहे. यामध्ये जर प्रशासनाकडून लक्ष दिले गेले तर नक्कीच एक उत्तम असे पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर विकसित होऊ शकतो.

Ajay Patil