file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) पुढील सात दिवस रात्री सहा तास बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासी सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी आणि त्या सेवा पुन्हा रुळावर आणण्याची तयारी सुरू आहे. ज्याप्रमाणे कोरोनापूर्वी रेल्वे धावत होत्या त्याप्रमाणे रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यांचे क्रमांक आणि विद्यमान प्रवासी बुकिंग डेटा अपडेट केला जाणार आहे. यासाठी सात दिवस दररोज सहा तास तिकीट बुक करणं किंवा रद्द करणं यांसारख्या सेवा दिल्या जाणार नाहीत. यामुळे तिकीट सेवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी हे काम केलं जाणार आहे.

६ तास सर्व सेवा बंद राहणार:-  रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार अपग्रेडची ही प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून २१ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत पहाटे ५ वाजेपर्यंत PRS सिस्टीम बंद राहणार आहे.

यात सहा तासाच्या दरम्यान तिकीट रिझर्वेशन, तकीट रद्द आणि गाड्यांविषयीची माहिती अशा सर्व सेवा बंद राहणार आहे. मात्र १३९ या क्रमाकांवर प्रवाशी रेल्वेसंबंधी विचारपूस करू शकता.