अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Silk farming : भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural Country) असला तरीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडत आला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सुलतानी संकटांमुळे कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा (Farmer) पुरता भरडला जात आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या जिद्दीने व शरतीने आपल्या काळी आईची सेवा करत असून काळ्या आईने देखील बळीराजाला उपाशी ठेवले नाही.

बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) एका महिला शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये मोठा बदल करत चांगले नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

जिल्ह्यातील मेहकर तालुक्याच्या मौजे चिंचाळा येथील महिला शेतकरी लिलाबाई बाबू सिंग जाधव यांनी पारंपरिक पिकाला फाटा दिला आणि रेशीम शेतीचा (Silk farming) मार्ग चोखंदळला.

याकामी या महिला शेतकऱ्यास शासनाच्या पोखरा योजनेचा देखील हातभार लागला. लिलाबाई यांनी 2020-21 मध्ये रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. याकामी त्यांना कृषी पर्यवेक्षक धांडे व मेहकर यांनी मोठी मदत केली.

यांच्या मदतीने लिलाबाई यांनी या योजनेत सहभाग नोंदवला. रेशीम शेती करण्याचे सर्व मार्गदर्शन व तुतीची रोपे कुठून खरेदी करायचे याबाबत सर्व मार्गदर्शन त्यांना कृषी विभागाकडून तसेच बुलढाणा जिल्हा रेशीम कार्यालयाकडून मिळाले.

रेशीम शेतीची सर्व माहिती घेतल्यानंतर लिलाबाई यांनी अवघ्या चार महिन्यांत 1000 स्क्वेअर फुट जागेत रेशीम शेतीसाठी आवश्यक रेशीम कीटक (Silkworm) संगोपन गृह देखील स्थापन केले. त्यानंतर त्यांनी दोनशे अंडीपुंजची (Ovipositor) पहिली बॅच काढली.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ऑगस्ट 2021 मध्ये रेशीम कीटक संगोपन घेण्यास लीलाबाई यांनी सुरुवात केली. त्यांना गुळवे रेशीम चॉकी केंद्र, बुलडाणा यांच्याकडून बाल कीटकांचा पुरवठा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितलं.

त्यापासून त्यांना 202 किलो ग्रॅम कोष उत्पादन मिळाले. प्रति किलोग्रॅमचा 415 रुपये दर मिळाला. अर्थातच त्यांना यातून 84 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. निश्चितच महिला असून देखील लिलाबाई यांनी प्राप्त केलेले यश सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. यानंतर त्यांनी दुसरी बॅच घेतली त्यातून त्यांना 64 हजाराचे उत्पन्न मिळाले.

सलग दोन्ही बॅच यशस्वी झाल्याने त्यांचे मनोबल उंचावले आणि त्यांना रेशीम शेती विश्वासाची वाटू लागली. या अनुषंगाने त्यांनी दोनशे अंडीपूजची तिसरी बाजू घेतली आणि त्यातून सुमारे एक लाख 26 हजारांचे उत्पन्न मिळवले.