Farmer succes story : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol and diesel prices) आकाशाला गवसणी घालत आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे (Fuel Rate) अन वाढत्या महागाईमुळे (Rising Inflation) सर्वसामान्यांना उदरनिर्वाह भागवणे देखील मोठं जिकिरीचं बनले आहे.

दैनंदिन गरजेच्या वस्तू असो की किराणा असो की भाजीपाला असो की सार्वजनिक वाहतुकीचे भाडे प्रत्येक गोष्ट ही अभूतपूर्व महाग झाली आहे. या सर्वांचा फटका विशेषता इंधनाच्या वाढत्या दराचा फटका सर्वाधिक शेतकऱ्यांना (Farmer) बसत आहे.

यामुळे अनेक शेतकरी बांधव इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. पण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे प्रत्येक शेतकऱ्याच्या आवाक्यातील नसते. यामुळे गुजरातमधील (Gujrat Farmer) एका तरुण शेतकऱ्याने एक भन्नाट कामगिरी केली आहे. या नवयुवक शेतकऱ्याने बॅटरीवर चालणारा ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ (Electric Tractor) बनवला आहे. या तरुणाचा हा शोध सर्वत्र कौतुकला जातं असून हा तरुण शेतकरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या तरुणांचे सर्वत्र तोंडभरून कौतुक केले जातं आहे.

बॅटरी चलित ट्रॅक्टरची निर्मिती
हाती आलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना कंटाळून गुजरातमधील (Gujrat) जामनगर जिल्ह्यातील कलावद तालुक्यातील पिपर गावातील एका 34 वर्षीय शेतकऱ्याने (Farming) शेती कामांसाठी एका नवीन ट्रॅक्टर ची निर्मिती केली आहे.

या शेतकऱ्याने चक्क बॅटरीवर चालणारे ट्रॅक्टर विकसित करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. महेश भाई नामक शेतकऱ्याने बॅटरीवर चालणारे ट्रॅक्टर विकसित करण्याची किमया साधली आहे. या बॅटरी चलित ट्रॅक्टरला महेशने ‘व्योम’ असं नामकरण केले आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महेशचे वडील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीत देखील आहे. वडील शेतकरी असल्याने महेश लहानपणापासून शेतीचे काम पाहत आले आहेत आणि त्यांना शेतीची देखील विशेष आवड आहे. यामुळेच त्यांनी शेतीमध्ये वाढत असलेला उत्पादन खर्च लक्षात घेता या बॅटरी चलित ट्रॅक्टरची निर्मिती केल्याचे सांगितले जात आहे.

जाणुन घ्या या भन्नाट ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
मित्रांनो व्योम इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी 22 एचपीची पॉवर आवश्यक आहे, यासाठी महेश यांनी या ट्रॅक्टरमध्ये 72 वॅट लिथियम बॅटरी लावली आहे. महेश यांच्या मते, ही लिथीयम बॅटरी उत्तम दर्जाची बॅटरी आहे, विशेष म्हणजे या बॅटरीला घडी-घडी बदलण्याची गरज पडणार नाही असा महेश यांचा दावा आहे.

महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रॅक्टर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तासांचा कालावधी पुरेसा आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर महेश ने तयार केलेला हा ट्रॅक्टर तब्बल 10 तास चालू शकतो. निश्चितच या बॅटरी चलित ट्रॅक्टरची रेंज खूपच अधिक आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

याशिवाय या ट्रॅक्टरच्या काही अद्ययावत फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यात काही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये देखील आहेत. महेश ने या ट्रॅक्टर मध्ये काही हायटेक फिचर्स देखील वापरले आहेत जसे की, ट्रॅक्टरचा वेग फोनवरूनही नियंत्रित करता येतो.

यात एक मोटर देखील आहे जी पाण्याची गरज असताना वापरता येते. या हायटेक फिचर्स व्यतिरिक्त या ट्रॅक्टर ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या ट्रॅक्टरमुळे प्रदूषण अजिबातचं होतं नाही म्हणजेच हा ट्रॅक्टर इको फ्रेंडली आहे.

सध्या वैश्विक स्तरावर वाढत असलेले प्रदूषण सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे आणि महेश यांनी यावर प्रकाशझोत टाकून प्रदूषणविरहित वाहन निर्माण करून निश्चितच एक कौतुकास्पद कार्य केले आहे. महेश यांनी तयार केलेला हा बॅटरी चलित ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे इंधन बचत शिवाय प्रदूषण टाळता येतं असल्याने या ट्रॅक्टरला अधिक पसंत केलं जातं आहे.