Farmer succes story : सध्या शेती व्यवसायाकडे (Farming) मोठ्या आशेने बघितले जाऊ लागले आहे. शेतीमध्ये काळाच्या ओघात आता बदल देखील बघायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना (Farmers) शेतीतून चांगले उत्पन्न (Farmers Income) देखील आता मिळू लागले आहे. यामुळे आता नवयुवक शेतीकडे वळत असून शेतीमध्ये काळाच्या ओघात आधुनिकतेची कास धरत चांगले उत्पन्न कमवीत आहेत. मित्रांनो शेती हा एक असा व्यवसाय आहे जो बारामाही केला जातो.

या व्यवसायात काळाच्या ओघात आवश्यक तो बदल केला गेला तर या व्यवसायातून चांगला बक्कळ नफा देखील कमावला जाऊ शकतो. बिहारमधील बांका जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील शेतीतून लाखोंचे उत्पन्न कमावले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. प्रदीप कुमार गुप्ता नामक या व्यक्तीने शेतीतून लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे.

बांका जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी प्रदीप कुमार गुप्ता स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये विविध भाज्या आणि फळांची लागवड करून वर्षाला सुमारे 18 लाख रुपये कमवत आहेत. शेतकरी प्रदीप गुप्ता सांगतात की, ते जवळपास 35 वर्षांपासून त्यांच्या फार्म हाऊसमध्ये शेती करत आहेत. याशिवाय पशुपालनाचे कामही करत आहेत. आज आपण प्रदीप कुमार गुप्ता यांच्या शेती व्यवसायातील प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

शेतकरी प्रदीप कुमार गुप्ता सांगतात की, त्यांनी जवळपास 20 वर्षांची राजकारणातील कारकीर्द हाताळली आहे. त्यानंतरही त्यांची आवड शेतीतच राहिली आणि त्यांची आवड जोपासत त्यांनी शेती व्यवसायात आपला ठसा उमटवला.

शेतकरी प्रदीपकुमार गुप्ता यांनी 1988 मध्ये सुमारे 18 एकर जमिनीत फळबागायती तसेच इतर पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली. सन 1988 ते 2022 पर्यंत प्रदीप कुमार गुप्ता यांना शेतीत खूप मोठे नुकसान सहन करावे लागले.

पण नुकसान सहन करून मोठ्या जिद्दीने त्यांनी पुन्हा उभारी घेत शेती सुरु केली. प्रदीप त्यांच्या ध्येयावर ठाम राहिले, शेवटी प्रदीप कुमार एक यशस्वी शेतकरी म्हणून समोर आले आणि आज इतर सर्व शेतकर्‍यांसाठी आदर्श ठरले आहेत.

शेतकरी प्रदीपकुमार गुप्ता यांनी त्यांच्या फार्म हाऊसमध्ये सुमारे 500 आंब्याची झाडे, 1000 पपई, 300 नारळ, सागवान, शिसम, फणस, लिची, लिंबू, हिंग, तमालपत्र, केळी, भोपळा, मका, भात-गहू यांची लागवड केली आहे.

याशिवाय प्रदीप कुमार हे शेती पूरक व्यवसाय देखील करतात. प्रदीप कुमार गाय पालन, शेळीपालन तसेच कुकुट पालन करत आहेत. याशिवाय प्रदीप कुमार इतर शेतकऱ्यांना पशुपालनाचे प्रशिक्षणही देत ​​आहेत.

निश्चितच वीस वर्षे राजकारणात असून देखील प्रदीप यांची शेती वरची माया काही कमी झाली नाही आणि काळ्या आईने देखील प्रदीप यांना काही कमी केले नाही. प्रदीप इतर शेतकऱ्यांसाठी निश्‍चितच आदर्श ठरत आहेत.