Krushi news : मित्रांनो सध्या संपूर्ण देशात नॅनो युरियाचा (Nano Urea) वापर वाढत आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना (Farmers) प्रोत्साहित करीत आहेत.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की नॅनो युरिया हे द्रवरूप युरीयाचे (Liquid Urea) स्वरूप आहे. नॅनो युरिया लिक्विड स्वरूपात येत असल्याने याचा वापर पिकांसाठी (Crop) अधिक प्रभावी ठरत आहे.

विशेष म्हणजे यामुळे युरियाची मात्रा देखील कमी लागते यामुळे साहजिकच उत्पादन खर्चात मोठी बचत होते. असा दावा केला जातो की, 500 मिली नॅनो युरिया हा तब्बल एक बॅग युरियाच्या गोणी बरोबर प्रभाव दाखवण्यास सक्षम आहे.

यामुळे उत्पादन खर्चाचा विचार करता नॅनो युरीया शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर पर्याय ठरणार आहे. फक्त उत्पादन खर्चात यामुळे बचत होणार असे नाही तर नॅनो युरियाच्या वापरामुळे पिकांची गुणवत्ता देखील राखली जाणार आहे शिवाय पिकांच्या उत्पादनात देखील भरीव वाढ होणार असल्याचा दावा केला जातो.

यामुळे नॅनो युरिया शेतकऱ्यांना तिहेरी फायदा मिळवून देत असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगत आहेत.नॅनो युरिया लिक्विड स्वरूपात उपलब्ध असल्याने याचा जमिनीच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत नसल्याचा दावा केला जातो.

शिवाय यामुळे पर्यावरणाचे देखील संवर्धन होते. म्हणजेच नॅनो युरिया वापरल्याने जमिनीचा पोत अबाधित राखला जातो शिवाय पर्यावरण संवर्धन देखील केले जाऊ शकते. यामुळे शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन तर मिळणारच आहे शिवाय भविष्यात काळ्या आईचे आरोग्य देखील सही सलामत राखता येणार आहे.

नॅनो युरिया विषयी अधिक माहिती देताना इफकोच्या वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. ब्रजपाल सिंग यांनी सांगितलं की, युरियाच्या तुलनेत नॅनो लिक्विड युरियाचा वापर केल्यास पिकांची गुणवत्ता वाढते. विशेष म्हणजे नॅनो युरिया हे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे.

मित्रांनो कृषी वैज्ञानिक दावा करतात की, पिकांना 50 टक्के नत्र साधारण युरियाद्वारे मिळते, तर 80 टक्के नत्र पिकांना इफको नॅनो लिक्विड युरियाच्या फवारणीद्वारे मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नॅनो लिक्विड युरियाचा वापर करावा असे देखील आव्हान कृषी क्षेत्रातील जाणकार लोक करत आहेत.

निश्चितच भविष्यात आवश्यक अन्नधान्याचा विचार करता जमिनीचे आरोग्य अबाधित राखणे सर्वांसाठी एक आव्हान आहे शिवाय उत्पादन वाढीसाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्याच्या शेतीचा विचार करताना नॅनो युरिया एक गेम चेंजर सिद्ध होणार असून याच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होणार आहे तसेच जमिनीचे आरोग्य अबाधित राहणार आहे. पिकांच्या उत्पादनात वाढ झाली तर साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.