अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या माजी पत्नी रेहम खान यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे.(Pakistan’s Prime Minister Imran Khan)

हा हल्ला घडवून आणला आहे असे रेहम खान यांचे म्हणणे आहे. रेहम खान पुतण्याच्या लग्नाहुन घरी येत असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे.

आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवत कार थांबवण्यास सांगितले. रेहम खान यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. सोबतच ‘हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान’ असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

रेहम खान यांच्या म्हणण्यानुसार गाडीतील ड्रायव्हर व एक सुरक्षारक्षक असल्यामुळे त्या वाचल्या आहेत. तसेच त्यांचे पूर्व पती पंतप्रधान इम्रान खानकडे बोट दाखवत त्यांनी पाकिस्तानमध्ये हल्ले ठरवून होतात असे म्हटले आहे.

रेहम खान या पूर्व पती इम्रान खान यांच्यावर सतत टीका करत असतात. बलात्कार, महिलांवर अत्याचार, महिलांचे प्रश्न यावरून त्यांनी नेहमी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मला एखाद्या सामान्य पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे पाकिस्तानात जगायचा आहे, आणि मरायचे आहे.

माझ्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी आहे. तसेच मी देशासाठी गोळ्या झेलण्यासाठी देखील तयार आहे. असे रेहम खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.