अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Farming Success Story :- (Vegetable Cultivation) करीत आहेत. अल्प कालावधी काढणीसाठी तयार होणाऱ्या हंगामी पिकाची लागवड शेतकऱ्यांना विशेष फायदेशीर ठरत आहे.

भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड तसेच हंगामी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी बांधवांना अत्यल्प खर्च येत असल्याने ही शेती (Farming) शेतकरी बांधवांसाठी विशेष वरदान सिद्ध होत आहे.

उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासाठी देखील भाजीपाला वर्गीय पिकांची शेती विशेष फायदेशीर ठरली असून आज हा पठ्ठ्या भाजीपाला पिकांच्या लागवडीतून जंगी कमाई करत आहे.

विशेष म्हणजे या अवलिया शेतकऱ्याने सरकारी नोकरी सोडून भाजीपाला पिकाची शेती करत लाखो रुपयांची कमाई (Farmers Income) करण्याची किमया साधली आहे.

कोण आहे हा अवलिया डॉ.किशन राणा हे मूळचे उत्तराखंडमधील (Uttrakhand) बागेश्वर जिल्ह्यातील रहिवासी शेतकरी आहेत. मित्रांनो किशन यांनी उच्च शिक्षण ग्रहण केले आहे, त्यांनी पीएचडीचे शिक्षण घेतले आहे.

पीएचडी केल्यानंतर किशन राणा यांना अनेक सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या, पण लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने आणि नोकरीऐवजी शेतीमध्येचं अधिक मन रमत असल्याने किशन राणा यांनी सरकारी नोकरी करण्याऐवजी शेती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

या अनुषंगाने पीएचडीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या गावी परतून भाजीपाला लागवड करीत किशन यांनी लाखो रुपयांचा नफा कमावला. शेतीमध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांनी अख्ख्या जिल्ह्यात नावलौकिक मिळवलं आहे.

आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, किशन राणा यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरत भाजीपाला लागवड केली आहे.

भाजीपाला लागवड करण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात पॉलिहाऊसची उभारणी केली आणि या शेतीच्या माध्यमातून त्यांनी विविध भाज्यांची लागवड करत चांगले उत्पादन मिळविले आहे.

त्यांनी आपल्या शेतात सिमला मिरची, सोयाबीन, टोमॅटो, कारले, करवंद, वांगी इत्यादी भाज्यांची लागवड केली आहे. याशिवाय डॉ.किशनसिंग राणा हे दरवर्षी जिल्ह्यातील लोकांना शेतीशी संबंधित सर्व प्रकारची माहिती आणि नवीन तंत्र अवगत व्हावे म्हणुन एका विशिष्ट स्पर्धेचे आयोजन करतात. या स्पर्धेमध्ये विजेत्याला रोख रक्कम देऊन गौरविले जाते.

तरुणांना दिला हा कानमंत्र किशन यांच्या मते, शेती व्यवसायातून देशातील तरुणांना चांगला रोजगार निर्माण होऊ शकतो. यामुळे ग्रामीण भागातील नवयुवक तरुणांना रोजगाराच्या शोधात इकडे तिकडे भटकण्याची गरज भासणार नाही. तरुणवर्ग शेती व्यवसायात उतरून शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग राबवित स्वत:ला स्वावलंबी बनू शकतात.