मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना वीस फूट खड्ड्यामध्ये गाळू. स्मशानात गवऱ्या पाठविल्या. असे वक्तव्य शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते.

यांनतर तब्बल १४ दिवसानंतर माध्यमांशी संवाद साधताना रवी राणा यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, कोर्टानी राजद्रोहाचा गुन्हा हा चुकीचा आहे, हे सांगितले. त्या कोर्टावर (Court) आक्षेप घेण्याचं काम खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

मला वाटतं संजय राऊत हे चवन्नीछाप आहेत. चवन्नीछाप संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बकबक करतात. कोर्टावरही ते ताशेरे उमटवितात. त्यांना हा अधिकार कुणी दिला, असा सवाल यावेळी रवी राणा यांनी उपस्थित केला आहे.

तसेच अमरावतीला आमच्या घरावर हल्ला झाला. शिवसैनिकांनी दगड फेकले. पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली. हे संपूर्ण देश पाहत होता. माझ्या घरी चार, सात वर्षींची मुलं होती. तिथं जाऊन शिवसैनिक दगड मारत होते. त्यांना आदेश दिला जातो की, त्यांच्या घरावर हमला करा.

दिल्लीमध्ये (Delhi) संजय राऊत व अनिल परब यांची ईडीच्या (ED) माध्यमातून चौकशी झाली आहे. त्यावर केंद्रानं समोर येऊन कारवाई केली पाहिजे. येणाऱ्या काळात रामभक्त आणि हनुमान भक्त येणाऱ्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जागा दाखवतील.

संजय राऊत व अनिल परब (Anil Parab) यांच्या घोटाळ्याच्या फाईल्स ईडीकडं प्रलंबित प्रकरणांचा दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचेही रवी राणा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.