अखेर समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज केसमधून हटवलं

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक करणे अंमली विरोधी पथक अर्थात एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांना चांगलेच भोवले आहे.

वानखेडे यांना या प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. वानखेडे यांची मुंबई एनसीबीतून दिल्ली एनसीबीत बदली करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. वानखेडे यांची बदली हा वानखेडेंसाठी मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहे.

क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता.

त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती.

मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याचाच परिणाम म्हणून वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. दिल्ली झोनमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!