अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-  शासकीय विलनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यातच नगर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी देखील सहभागी आहे.(ST Workers Strike) 

दरम्यान सरकारकडून देण्यात आलेल्या अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान यातच आज नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एसटी आगारामध्ये संपावर असलेल्यांपैकी काही कर्मचारी हजर झाल्याने श्रीरामपूर बस स्थानकातून सायंकाळपासून सर्वसामान्यांची लालपरी नागरिकांसाठी धावू लागली आहे.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेले सर्वसामान्य प्रवाशांचे हाल कुठेतरी थांबतील अशी आशा पल्लवित झाली आहे.

श्रीरामपूर आगारामध्ये 300 पेक्षा जास्त एसटी कर्मचारी असून त्यापैकी काही कर्मचारी काल बुधवारी हजर झाल्याने काल सायंकाळपासून काही मार्गावरील बसेस श्रीरामपूर आगारातुन सोडण्यात आल्या आहे.