Maharashtra news : देहू येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आले होते. त्यांच्या या दौऱ्यात चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच.

पुण्यातील लोहगाव लोहगाव विमानतळावर मोदी यांचे स्वागत करण्यासाठी गेलेल्या अजितदादांच्या जवळ येऊन मोदींच्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. या जवळकीची चर्चा होत असताना प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी मात्र वेगळेच घडले.

देहूतील कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची परवानगी मिळाली, मात्र अजित पवार यांना भाषण करू देण्यात आले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पवार येथे उपस्थित होते.

त्यांनी आधीच परवानगी मागितली होती, मात्र ती देण्यात आली नाही.यावरून आता टीका सुरू झाली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, ही भाजपची दडपशाही आहे, देहूतील कार्यक्रम भाजपनेच ताब्यात घेतला, अशी टीका आता होऊ लागली आहे. त्यामुळे अजितदादाच पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.