file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-  नगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

मनपाच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपकडून माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज कोतकर हे इच्छुक होते. मात्र या पदी गंधे यांची वर्णी लागली आहे.

महापालिकेचे विरोधी पक्षनेता पद संपत बारस्कर यांच्या रूपाने सध्या राष्ट्रवादीकडे होते; परंतु महापालिकेत सत्तांतर झाले. सेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली.

मनपातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने विरोधी पक्षनेता पदावर दावा केला होता; परंतु भाजपमध्ये एकमत होत नव्हते. अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महेंद्र गंधे यांचे नाव सुचविले असून,

तसे पत्र त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सोशल मीडियाद्वारे दिलेय. हे पत्र माजी आमदार कर्डिले शनिवारी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे दाखल करणार आहेत.

त्यानंतर महापौरांकडून गंधे यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र देतील. दरम्यान विरोधी पक्षनेता नियुक्तीची जबाबदारी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सोपविली होती.

अखेर प्रदेशाध्यक्ष पाटील व राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यात चर्चा होऊन अखेर गंधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला.