Flipkart Big Billion Days : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन (smartphone) घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good news) आहे. कारण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची अधिकृत तारीख निश्चित झाली आहे. सेल 23 सप्टेंबरपासून (September 23) सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल.

नेहमीप्रमाणे, Flipkart Plus सदस्य या सेलचा एक दिवस आधी म्हणजे 22 सप्टेंबरपासून लाभ घेऊ शकतील. Flipkart ने त्याच्या विक्रीसाठी ICICI आणि Axis Bank सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना ही कार्डे वापरून 10% सूट मिळू शकेल.

फ्लिपकार्टने या ऑफर्सची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही, मात्र आयफोनचे मॉडेल आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय मोटोरोला, सॅमसंग, रियलमी, पोको या ब्रँडचे फोन कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत.

असे कळते की फेस्टिव्हल सेलमध्ये फ्लिपकार्ट Poco F4 5G, Poco X4 5G, Poco M4 Pro 5G, Oppo Reno 8 5G, Motorola Edge 30, Moto G62, Moto G32, Realme 9i 5G, Realme 9 सारख्या फोनवर ऑफर देईल.

माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की त्याच वेळी Amazon 23 सप्टेंबरपासून सुरू होणारा Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल देखील आयोजित करत आहे.

अॅमेझॉनने आपल्या सेलमध्ये आयफोन मॉडेल्स तसेच सॅमसंग, शाओमी, रेडमी, आयक्यूओ, विवो या ब्रँडचे फोन कमी किमतीत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.