Flipkart Offers:  तुम्ही देखील स्वतःसाठी स्वस्त आणि जबरदस्त स्मार्टफोन शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या एक अशा ऑफरबद्दल माहिती देणार आहोत

ज्यामुळे तुम्ही फक्त 549 रुपयांमध्ये Realme चा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. या फोनची किंमत मार्केटमध्ये 9,999 रुपये आहे. चला तर जाणून घ्या या दमदार ऑफरबद्दल सर्वकाही. आज आम्ही येथे Realme C30s या स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर या फोनसाठी दमदार ऑफर जाहीर केली आहे. 9,999 रुपयांचा हा फोन फ्लिपकार्डवर तुम्हाला फक्त  6,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Realme C30s Flipkart ऑफर 

फ्लिपकार्टवर कंपनी या स्मार्टफोनवर 3 हजारांची बंपर सूट देत आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अॅक्सिस बँक किंवा एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला यावर 700 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

फ्लिपकार्ट ऑफर्स दरम्यान, यावर 6,450 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही फक्त या एक्सचेंज बोनसचा लाभ घेतल्यास, तुम्ही फक्त Rs 549 मध्ये Realme C30s खरेदी करू शकाल. या स्मार्टफोनवर कंपनी तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी आणि 7 दिवसांची रिप्लेसमेंट सुविधा देखील देत आहे.

Realme C30s तपशील

Realme C30s हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. परंतु, एंट्री लेव्हल असूनही, तुम्हाला त्यात अप्रतिम फीचर्स मिळतात. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या जलद रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. Realme ने या स्मार्टफोनमध्ये octa-core UniSoC SC9863A चिपसेट वापरला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की हा स्मार्टफोन Android 12 सह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट केला आहे. परंतु, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने त्याचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. त्याच्या मागील बाजूस, तुम्हाला 8MP प्राथमिक कॅमेरा मिळेल आणि समोर, तुम्हाला 5MP सेल्फी शूटर मिळेल. कंपनीने Realme C30s मध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे.

हे पण वाचा :-  Smartphone Blast: सावधान ! स्मार्टफोनमध्ये होईल बॉम्बसारखा स्फोट ; तुम्हीही करत नाहीना ‘ह्या’ 5 चुका ; वाचा सविस्तर