अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- करोनाच्या महामारीनंतर थोड्या प्रमाणात का होईना व्यवहार सुरळीत सुरू होत असताना पुन्हा अनेक गावांमध्ये डेंग्यू, गोचीड ताप,

चिकनगुनिया यासारखे आजार होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आता हतबल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अशाच काही आजारांनी प्रवराला विळखा घातला आहे. सध्या स्थितीत प्रवरा परिसरात चिकन गुनिया, डेंग्यू, गोचीड तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसू लागले असून

ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसू लागली आहे. दवाखान्यात गेल्यानंतर प्रथम उपचारानंतर रुग्णांना गोळ्या औषधे दिल्यानंतर बरे लागले तर ठीक नाही तर रुग्णांना रक्त लघवी चेक केल्याशिवाय पर्याय राहत नाही.

त्यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर जाणार्‍या नागरिकांना याची मोठी झळ सोसावी लागते. अशा आजारांपासून मुक्तता मिळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन

गावात स्वच्छता अभियान राबवणे सध्या गरजेचे झाले आहे. कोरोनाचे संकट अद्याप कायम असताना साथीच्या आजाराने डोके वर काढले असल्याचे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.