अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- फोर्ब्स या सर्वात लोकप्रिय मासिकाने जगातील 100 शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यावेळी मॅकेन्झी स्कॉट यांनी जर्मन चांसलरला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या शक्तिशाली महिला बनल्या आहेत या यादीत युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड तिसऱ्या स्थानावर आहेत.

त्याच वेळी, जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बारा या यादीत चौथ्या स्थानावर आहेत, तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स पाचव्या स्थानावर आहेत.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही या यादीत स्थान मिळाले असून, त्या 37 व्या क्रमांकावर आहेत. Nykaa च्या संस्थापक आणि CEO फाल्गुनी नायर यांना देखील या यादीत स्थान देण्यात आले आहे.
त्या या यादीत 88 व्या स्थानावर आहेत. फोर्ब्सने एचसीएल टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन रोशनी नाडर यांना 52 वे स्थान दिले आहे. यासह ब्रिटनची राणी एलिझाबेथ 70 व्या स्थानावर आहे,
तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी 2021 मध्ये पहिल्यांदा या यादीत स्थान मिळवले. त्या 43 व्या क्रमांकावर आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम