file photo

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जमत नाही. दोघांत ३६चा आकडा आहे.

नागपूरवाल्यांना हे माहीत आहे, असे सांगत फडणवीस यांची जिरवायचीच हाेती, असे गडकरींनी आपल्या कानात सांगितले होते, असे खळबळजनक काँग्रेस नेते व मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोहगाव येथे केले.

देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, परवा गडकरी साहेबांसोबत बैठक झाली. त्यांनी सांगितले, आम्ही पैसे देतो.

त्यांचे तिकडे कुठे जमत नाही. नागपूरवाल्यांना माहीत आहे. सध्या तिकडे दोन टोके आहेत. एकीकडे गडकरी साहेब, दुसरीकडे फडणवीस. गडकरींनी तेव्हा कानात सांगितले की, फडणवीस यांची जिरवायचीच होती.

भविष्यातही ते आणखी जिरवतील. दरम्यान याबाबत गडकरी म्हणाले आहे कि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मी विजय वडेट्टीवार यांना कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही.

वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार व खोडसाळ राजकारण करू नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिला. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे, एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा असल्याचा टोला त्यांनी लगावला.

फडणवीस धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली.

विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करत आहेत. आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत.