अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-स्वस्तात किराणामाल देतो असे म्हणून तब्बल चार लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक करण्याची घटना कर्जतमध्ये घडली. याप्रकरणी याबाबत जयसिंग मुरारराव तोरडमल (रा. कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे.

दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी बारामती व इंदापूर येथील दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वैभव अरुण सोनटक्के (रा. बारामती) व विशाल मारे (रा. डालज, तालुका इंदापूर) यांनी आम्ही होलसेल व कमी दराने अनेक मोठ्या व्यापाऱ्यांना किराणामाल देतो.

आपण आमच्याकडे ऑर्डर द्या असे म्हणाले. यानंतर जयसिंग तोरडमल यांनी कर्जत येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेमधून वरील दोघा जणांना ४ लाख ६९ हजार ८५० रुपये आरटीजीएस केले.

मात्र पैसे पाठवूनही वैभव सोनटक्के व विशाल मारे यांनी तोरडमल यांना किराणा माल ऑर्डरप्रमाणे पाठवला नाही व त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी जयसिंग मुरारराव तोरडमल (रा. कर्जत) यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये सोनटक्के व मारे यांच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे