Recharge Plans : तुम्ही जर एअरटेल मोबाईल, डीटीएच, ब्रॉडबँड आणि वाय-फाय वापरत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. आता तुम्हाला एअरटेल मोबाईल/डीटीएच रिचार्ज, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर पेमेंटवर एअरटेल थँक्स अॅपद्वारे 25 टक्के खात्रीशीर कॅशबॅक देखील मिळू शकेल परंतु यासाठी तुमच्याकडे एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.

या व्यतिरिक्त जर तुम्ही वीज, गॅस आणि पाण्याचे बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा स्विगी आणि झोमॅटो वरून खाद्यपदार्थ ऑर्डर कराल, तर एअरटेल अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी एक उत्तम कार्ड सिद्ध होऊ शकते. अलीकडेच भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँकेने हे क्रेडिट कार्ड लॉन्च केले.

एअरटेल थँक्स अॅपवर हे क्रेडिट कार्ड वापरण्याचा अधिक फायदा :

हे एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे. एअरटेल थँक्स अॅपवर हे क्रेडिट कार्ड वापरल्यास ग्राहकांना अधिक फायदा होईल. हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील वापरले जाऊ शकते.