file photo

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील ९ गावांतील जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा फेरविचार करून नियमात शिथिलता द्यावी, याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

यांना मुंबई येथे निवेदन सादर केल्याची माहिती जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी दिली. निवेदनात नागवडे यांनी म्हटले आहे की, सध्या शारदीय नवरात्र उत्सव चालू आहेत.

त्यामुळे जनतेला बाजारातील विविध वस्तूंची आवश्यकता आहे. परंतु श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी, बेलवंडी, मढेवडगाव, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, येळपणे, घारगाव,

शेडगाव, कौठा ही गावे दहापेक्षा कोरोना पेशंट असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. श्रीगोंदे तालुक्यात वरील सर्व गावे ही प्रमुख बाजारपेठ असणारी गावे आहेत.

सदरची गावे सध्या लॉकडाऊन केल्यामुळे सण उत्सवाच्या काळात सर्वसामान्य जनतेची फार मोठी गैरसोय झाली. राज्याचे महसूलमंत्री थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याप्रश्नी संवाद साधून लॉकडाऊन नियमात सुधारणा करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

या शिष्टमंडळात नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते, प्रा. सुनील माने, संजय काळे, राहुल पाचपुते आदींचा समावेश होता.