file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटताना आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. एकीकडे दिलासादायक परिस्थिती असली तरी दुसरीकडे एकट्या नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील करोना परिस्थीती आटोक्यात येत असताना अहमदनगर जिह्यातील करोना रुग्णांची संख्या मात्र चिंताजनक आहे.

नगरमध्ये गावबंदी करायची असेल तरी करा, असे सांगतानाच नगरमध्ये रुग्ण नेमके कुठले आहेत ते तपासण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुण्यात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक रूग्ण नगर जिल्ह्यातील आहेत. नगरचे जवळपास 40 टक्के रुग्ण आहेत.

यात संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यातील सर्वाधिक रूग्ण आहेत. याबाबत नाशिक आणि नगर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

त्यावेळी रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. नगर जिह्यात संगमनेर, पारनेरमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. तिथे कठोर निर्बंध लागू करा आणि कोरोनाचा संसर्ग रोखा, असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.