अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे, या परीक्षांमध्ये संपूर्ण देशभरातुन हजारो विद्यार्थी बसले होते.

सदर परीक्षामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील गुहा गावामध्ये असलेल्या “गंगाधर बाबा छात्रालय” या अनाथ आश्रमातील विद्यार्थी अ‍ॅड. महेश रामचंद्र बडाख याने देखील जिद्दीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर बाजी मारली आहे.

अ‍ॅड. महेश रामचंद्र बडाख याने या देश पातळीवर प्रशासकीय पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये देशात २३ व्वा क्रमांक पटकावला असुन त्याची देशातील महत्वाचे असलेले केंद्रिय ट्रेडमार्क आणि भौगोलीक संकेतांचे परीक्षक या पदावर नियुक्ती होणार आहे.

राहुरी तालुक्यातील गुहा,कानडगाव सारख्या छोट्या गावातुन आलेला महेश आता देशातील केंद्रीय ट्रेडमार्क आणि भौगोलिक संकेताचे परीक्षक या पदाची धुरा सांभाळणार, त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

मी आयुष्यातील या यशस्वी प्रवासाचा हा टप्पा मा.न्या.बी.जी.कोळसे पाटील साहेब याच्या प्रेरणेमुळे गाठू शकलो अशी प्रतिक्रिया महेश याने “अहमदनगर माझा” शी बोलताना व्यक्त केली आहे.

गंगाधर बाबा छात्रालयाचे व्यवस्थापक श्री.प्रकाश सपकाळ यांच्या पाठबळामुळे तसेच सहकार्यामुळे आणि त्याच्या संपकल्पनेतून महेश याने पुणे येथे जाऊन मा.न्या.बी.जी.कोळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कायद्याचे शिक्षण पुणे केले होते, तसेच तो पुणे येथे आपलं कायद्याचं शिक्षण घेत असताना केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या सदर परीक्षांचा वेळ मिळेल तसा अभ्यास देखील करत होता.

आयुष्यातील फार खडतर प्रवास करत त्याने ही गरुडझेप घेत उंची गाठली आहे. वडीलांच्या छत्र लहान असताना हरवलेल्या महेशची घरची परिस्थिती फार हलाखीची परंतु गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालाय अंतर्गत त्याला उच्य शिक्षण घेण्याची संधी मिळाली आणि आज त्याने त्याच संधीच सोन करुन दाखवलं आहे..! ज्या गावातुन तो आला आहे ते त्याच गाव आज त्याच्या कौतुकापुढे ठेंगण झालं आहे..!