file photo

Gold Price Today : देशात आज मंगळवारी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली. सोन्याचा भाव 5 रुपयांनी घसरून 47,153 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

मागील व्यवहारात मौल्यवान धातू 47,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदी 287 रुपयांनी घसरून 64,453 रुपये प्रतिकिलो झाली. पूर्वीच्या व्यवहारात तो 64,740 रुपये प्रति किलो होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,802 डॉलर प्रति औंस होता आणि चांदीचा भाव 24.30 डॉलर प्रति औंस होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की,

मंगळवारी कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉल गोल्डच्या किमती कमजोर झाल्याने सोन्याचे भाव 0.27 टक्क्यांनी घसरून USD 1,802 प्रति औंस झाले. ते पुढे म्हणाले की, मजबूत डॉलर आणि यूएस बाँड उत्पन्नात वाढीमुळे मंगळवारी सोन्याच्या किमती दबावाखाली राहिल्या.

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 57 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्या सुरू असलेल्या किमती 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात.

चांदीचा विचार केल्यास त्यातही मोठी वाढ होऊ शकते. दिवाळीपर्यंत किंवा वर्षअखेरीस चांदीचे भाव 76,000 ते 82,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत जातील, असे बहुतांश व्यापाऱ्यांचे मत आहे.