खुशखबर ! आजपासून चित्रपटगृह व नाट्यगृह होणार सुरु

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वात आधी बंद झालेले सांस्कृतिक कार्यक्रमांचे हक्काचे व्यासपीठ रंगभूमी आणि चित्रपटगृह आजपासून (दि.22) शासन मान्यतेने खुली होत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आजपासून म्हणजेच, 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती.

या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केले होते.

त्यानुसार नाट्य व चित्रपटगृहात साफसफाई, सोशल डिस्टंगसिंगच्या दृष्टीने आसन व्यवस्था, सॅनिटायजेशन करण्यात आले. यावेळी जेव्हां प्रत्यक्ष प्रेक्षक प्रयोग किंवा सिनेमा पाहण्यासाठी येईल तेव्हा त्यांना थर्मल टेस्टद्वारे तापमानाची चाचणी घेऊनच सभागृहत प्रवेश देण्यास येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

याआधीही कोरोना व्हायरसच्या साथीमुळेच सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य होते. निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे पालन करण्यासदेखील सांगितले होते.

यंदा देखील अशाच पध्दतीची नियमावली सरकार जाहीरकरू शकते. कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!