अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाची परिस्थिती आता हळूहळू निवळत असल्याने लोकांची निर्बंधामधून सुटका झाली आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त वातावरणामध्ये दिवाळी साजरी होण्याची तयारी सुरू झाली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देशही दिले होते. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते.
राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ योजने अंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेऊन फटाके विक्रीवर बंदी घातली होती.
मागील वर्षी कोविड 19 नियमांमुळे नाशिक मध्ये 10 नोव्हेंबर 2020च्या मध्यरात्रीपासून फटाके फोडण्यात बंदी घालण्यात आली होती. फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश होते.
राज्यातील कोरोनाचं संकट अद्यापही घोंघावत आहे. त्यासोबतीने येणारा हिवाळा ऋतू कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी दिवाळीत फटाके फोडल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचं सांगत फटाके बंदी घालण्यात आली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम