7th Pay Commission : जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. अशातच आता त्यांच्या पगारात एकूण 9 हजार रुपयांची वाढ होणार आहे

महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढू शकतो

एका अंदाजानुसार, देशात आणि जगभरातील वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकार आगामी काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये आणखी वाढ करू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ही वाढ केंद्र सरकार जानेवारी 2023 पर्यंत करू शकते.

तर महागाई भत्ता शून्य होईल

केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील जानेवारी 2023 पर्यंत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 4 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 43 टक्के होईल.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार, जेव्हा डीए 50 टक्क्यांपर्यंत वाढवला जातो तेव्हा हा डीए केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात जोडला जातो आणि त्याच वेळी डीए शून्यावर आणला जातो. उल्लेखनीय आहे की 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्यावर आला होता.

इतर भत्ते देखील वाढू शकतात

अंदाजानुसार, केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार आणि महागाई भत्त्याव्यतिरिक्त, केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणाऱ्या इतर भत्त्यांमध्येही येत्या वर्षाच्या सुरुवातीला लक्षणीय वाढ होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचारी घर भाडे भत्त्यात (HRA) 3 टक्क्यांपर्यंत वाढ केंद्र सरकार करू शकते.