WhatsApp new feature : व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांची संख्याही जास्त आहे. याच वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

व्हॉट्सॲपवर आणखी एक अप्रतिम फीचर आले आहे. काह दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपने काही फीचर्स आणली होती. अशातच आणखी एक फीचर्स येत आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपचा आनंद आता डबल होणार आहे.

व्हॉट्सॲपचे नवीन फीचर विंडोज बीटा व्हर्जन 2.2240.1.0 वर दिसले आहे. या फीचर अंतर्गत यूजर्सना आणखी एक नवीन साइड बार मिळेल, ज्यामध्ये चॅट लिस्ट, स्टेटस आणि सेटिंग सोबत कॉलिंग ऑप्शन देखील दिसेल. या बटणाच्या मदतीने डेस्कटॉप वापरकर्ते व्हॉट्सॲप कॉलिंगचा आनंदही घेऊ शकतील. चाचणीनंतर लवकरच हे फीचर जारी केले जाईल अशी अपेक्षा आहे.

स्थिर आवृत्तीमध्ये कोणतेही फीचर लॉन्च करण्यापूर्वी, कंपनी काही काळ बीटा आवृत्ती म्हणून त्याची चाचणी करते आणि जेव्हा सर्वकाही ठीक होते, तेव्हा ते सर्व वापरकर्त्यांसाठी रिलीज केले जाते. नवीन फीचरमध्ये यूजर्सना कॉलिंग टॅबमध्ये कॉलिंग हिस्ट्री पाहण्याची सुविधाही मिळणार आहे. हे फीचर WABetaInfo या व्हॉट्सअॅपच्या फीचरचा मागोवा घेणाऱ्या कंपनीने पाहिले आहे.

Whatsapp Poll

व्हॉट्सॲप अनेक दिवसांपासून पोल फीचरची चाचणी करत होते आणि आता हे फीचर जारी करण्यात आले आहे. व्हॉट्सॲप पोल आता अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ॲप्सवर वापरता येणार आहेत. व्हॉट्सॲप पोलचा वापर ग्रुप चॅट आणि प्रायव्हेट चॅट्ससाठी केला जाऊ शकतो. व्हॉट्सॲप पोलसाठी वापरकर्त्यांना 12 पर्याय मिळतील.