file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  मराठवाडा तसेच मुक्त पाणलोटातील धुव्वाधार पावसामुळे जायकवाडी च्या जलाशयात नवीन पाण्याची आवक होत आहे. होती. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने हे धरण 95 टक्के भरताच विसर्ग सोडण्यात येणार आहे.

नाशिक, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातून या धरणात आणखी नवीन पाण्याची आवक होणार आहे. तसेच पाऊसही सुरू आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून पूर्ण क्षमतेने धरण न भरता काहीसे रिकामे ठेऊन या धरणातून पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता जायकवाडीत 85 टक्के पाणीसाठा होता.

तर नवीन पाण्याची आवक 17481 क्युसेक ने सुरु होती. काल मराठवाड्यातील वैजापूर, गंगापूर तसेच जायकवाडी जलाशयाच्या मुक्त पाणलोटात मुसळधार पाऊस सुरु होता.

त्यामुळे जायकवाडी जलाशयात 64 हजार 653 क्युसेक ने पाण्याची आवक होत होती. त्यात रात्रीतून आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

या धरणातील पाणीसाठा 87 टक्क्यांवर पोहचला होता. उपयुक्तसाठा 67.05 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक वाढल्याने हा साठा सकाळी 90 टक्क्यांच्या पुढे जावु शकतो.