UPSC Jobs 2022 : UPSC ची तयारी (UPSC Preparation) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. UPSC ने रिक्त पदांसाठी अर्ज (Application for vacancies) मागवले आहेत.

अधिकाऱ्यांसह इतर पदांसाठी ही भरती UPSC करणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://upsc.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

या पदांसाठी उमेदवार (UPSC candidate) 29 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज (Application) करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेत 54 पदे भरण्यात येणार आहेत. पदे व सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावेत, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

रिक्त जागा तपशील

  • वरिष्ठ प्रशिक्षक – 1 पद
  • उपसंचालक – 1 पद
  • शास्त्रज्ञ – 9 पदे
  • कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 1 पद
  • कामगार अंमलबजावणी अधिकारी- 42 पदे

कोण अर्ज करू शकतो

वरिष्ठ प्रशिक्षकाच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून सागरी जीवशास्त्र किंवा प्राणीशास्त्र किंवा मत्स्य विज्ञान या विषयात एमएससी केलेले असावे.

डेप्युटी डायरेक्टरसाठी (Deputy Director), उमेदवारांनी कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (Computer Application) किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये (Computer Science) पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. टेक किंवा बीई/बी असणे आवश्यक आहे.

अर्ज फी

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 25 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून शुल्क जमा केले जाऊ शकते. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.